शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वांगणीचा विकास खुंटला, राम पातकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:21 IST

एमएमआरडीएच्या विसंगत नियमावलीचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. विकास आराखड्याअभावी बदलापूरजवळील वांगणी परिसराचाही विकास खुंटला आहे

अंबरनाथ  - एमएमआरडीएच्या विसंगत नियमावलीचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. विकास आराखड्याअभावी बदलापूरजवळील वांगणी परिसराचाही विकास खुंटला आहे, असे मत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे स्थानिक नेते राम पातकर यांनी व्यक्त केलेआहे.पातकर यांच्या नेतृत्वाखाली वांगणी परिसर विकास समितीने अलीकडेच राज्याच्या नगररचना विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांची भेट घेऊन मुंबई महानगर विकास आराखड्यात आवश्यक दुरुस्ती करून मंजूर करण्याबाबत चर्चा केली.या शिष्टमंडळात निखिल शेलार, राहुल शेलार, एकनाथ शेलार, दीपक कुडके, विद्याधर पलांडे, गणेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. पंधरा दिवसांत यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी समितीला देण्यात आल्याची माहिती पातकर यांनी दिली. गेल्या काही वर्षांत बदलापूरजवळील ग्रामीण भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागाजवळच असलेल्या बदलापूर नगरपालिका हद्दीत २०-२० मजल्यांच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी मिळतआहे.परंतु, विभागीय तसेच विकास आराखडा नसल्याने वांगणीत इमारतींच्या बांधणीला परवानगी मिळत नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात चाळींचे प्रमाण वाढत चालले असून बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे.त्यामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एमएमआरडीएने विकास आराखडा जाहीर करून त्यांनाही नगरपालिका क्षेत्राप्रमाणे विकास नियंत्रण नियमावली लागू करावी, अशी आपली मागणी असल्याचे पातकर यांनी सांगितले. एमएमआरडीए कुठला निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.०.२ एफएसआय देऊन अन्यायपुण्याला एक एफएसआय, नगरपालिका, महापालिकांतर्गत असलेल्या मुरबाडला व शहापूरला एक एफएसआय बांधकाम परवानगी मिळत आहे. परंतु, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीजवळ असलेल्या वांगणी व इतर ग्रामीण भागाला मात्र ०.२ एफएसआय हे अन्यायकारक आहे. या भागालाही एक एफएसआयची परवानगी मिळावी. त्याचप्रमाणे गावठाण हद्दीपासून १५०० मीटर परीघ मान्य करण्यात यावा व रस्त्याजवळ २०० मीटरपर्यंत आर झोन जाहीर करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :thaneठाणे