भार्इंदर : एका वृद्ध दाम्पत्याने पायाच्या दुखऱ््या नसांची शस्त्रक्रिया एकाच वेळी करून वेदनामुक्त होत व्हॅलेन्टाइन डेचा आनंद लुटला. शैलेश मेहता (५६) व कश्मिरा मेहता (५३) यांना वर्षभरापासून व्हेरिकोज व्हेनचा त्रास होता. पायांची हालचाल मंदावल्याने घराबाहेर पडण्यासाठी त्यांना मदतनीसाची आवश्यकता भासे. त्यामुळे ते सर्वस्वी मुलांवर अवलंबून होते. दरवर्षी हे दाम्पत्य मुलाबाळांसह कुटुंबातील व्यक्तींवर प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करत. भेटवस्तू, शॉपिंग, सिनेमा व हॉटलमध्ये जेवणाचा बेत आखत. यंदा पायाच्या दुखण्यामुळे या आनंदाला मुकणार असे त्यांना वाटत होते. पण लेसर तंत्राचा वापर करत शस्त्रक्रिया केली, १४ फेब्रुवारीला ही शस्त्रक्रिया झाली. (प्रतिनिधी)
व्हॅलेंटाईन डेला केल्या शस्त्रक्रिया
By admin | Updated: February 15, 2017 04:23 IST