शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

वैद्य दाम्पत्याने सायकलने केली अष्टविनायक यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:21 IST

सहा दिवसांत कापले ६८० किलोमीटरचे अंतर; खराब रस्त्यांसह अनेक आव्हानांवर केली मात

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मागील वर्षीचा डोंबिवली ते पणजी या सायकलदौऱ्याचा अनुभव गाठीशी असलेले येथील शशांक वैद्य व मीरा वैद्य या दाम्पत्याने यंदा नुकतीच ६८० किलोमीटरची अष्टविनायक यात्रा सायकलने सहा दिवसांत पूर्ण केली. त्यांच्या या सायकलस्वारीचे शहरात कौतुक होत आहे.सायकलमित्र असलेल्या वैद्य दाम्पत्याने याआधी सायकलने सात दिवसांत अष्टविनायक यात्रा केली आहे. त्यामुळे यंदाही सात दिवसांत ही यात्रा पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मात्र, अगोदरच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ३ ते ८ नोव्हेंबर, अशा सहा दिवसांतच ६८० किलोमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेला सुरुवात केली.वैद्य दाम्पत्य पुढे म्हणाले की, ‘केवळ आवड व तब्येत राखण्यासाठी आम्ही सायकल चालवू लागलो. पुढे आम्हाला सायकलयात्रा करण्याचा छंदच जडला. माघी चतुर्थीनिमित्त ३४ वर्षे कल्याण ते पाली सायकलयात्रा करणारे विलास वैद्य व ठाण्यातील राजीव दुधळकर यांनी आम्हाला पालीच्या गणपतीपर्यंत साथ दिली. प्रथम महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले. तेथे विलास वैद्य यांनी आम्हाला पंक्चर झाल्यास ते कसे काढावे, ट्युब कशी बदलावी, सायकलमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण दिले. उल्हासनगर येथून सायकलवरून अष्टविनायक दर्शनास निघालेले उपेंद्र परब आणि हितेश कापडोस्कर हे आम्हाला महड येथे भेटले. महडच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पाली येथे मुक्काम केला.’ते पुढे म्हणाले, ‘दुसºया दिवशी तळेगावला मुक्काम केला. त्यानंतर तिसºया दिवशी दुपारी आम्ही थेऊरला पोहोचलो. तेथे थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिराचे विश्वस्थ हभप आनंद तांबे यांनी आमचे स्वागत केले. उरुळी ते जेजुरीमधील घाट टाळण्यासाठी आम्ही भांडगावमार्गे मोरगावला गेलो. वाटेत आम्हाला बारामती सायकल क्लबचे अन्य सायकलमित्र भेटले. धनंजय मदान यांनी मोरगाव येथे आमची राहण्याची सोय केली होती.’मोरगावहून सिद्धटेकला आम्ही गेलो. तेथील सिद्धिविनायकाच्या मंदिरातील पुजाऱ्यांना आम्ही सायकलवरून अष्टविनायक यात्रा करत आहोत, हे समजताच त्यांनी सायकलसाठी देवाचे हार दिले. हा आमच्यासाठी सुखद अनुभव होता,’ असे वैद्य म्हणाले. सिद्धटेकहून आम्ही परत दौंडमार्गे केडगाव चौफुला येथे मुक्कामासाठी आलो. वाटेत पाटस-सिद्धटेक हा ३३ किमीचा रस्ता खराब होता. याच रस्त्याने एकाच दिवसात आम्ही परतीचाही प्रवास केला. अशा एकंदर ६६ किमीच्या रस्त्यात पंक्चर काढण्याचे प्रशिक्षणही उपयोगी पडल्याचे ते म्हणाले.रात्रीपर्यंत ओझरमार्गे लेण्याद्रीला पोहोचण्याचे ठरवले होते. ओझरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली. तेथील ग्रामस्थांनी लेण्याद्रीच्या वाटेत वाघ असल्याचे सांगून रात्री प्रवास न करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही ओझरला मुक्काम केला. शेवटच्या दिवशी लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेतले. त्यानंतर गणेशखिंडीतील चढ पार केला व तेथील गणेश मंदिरात आम्ही दर्शन घेतले. माळशेज घाटातून मुरबाडमार्गे गोवेली येथे आम्ही पोहोचलो. तेथे रायते येथील मित्र आमच्या स्वागतासाठी आले होते. तेथे उल्हासनगरच्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही ८ नोव्हेंबरला डोंबिवलीला घरी परतलो. शेवटच्या दिवशी लेण्याद्री डोंगर चढणे, उतरणे यासह १४५ किमीचा सायकल प्रवास झाला होता. गोव्यापेक्षाही या यात्रेने आम्हाला खूप समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.दिवसभरात १२ तास केले सायकलिंगवैद्य दाम्पत्य सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत सायकलने प्रवास करत असे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू होत असे. त्यानंतर साधारण ९-९.३० च्या सुमारास नाश्त्यासाठी ते विसावा घेत. त्यानंतर, १० ते १२.३० च्या सुमारास मधला टप्पा. त्यानंतर जेवण, विश्रांतीनंतर दुपारी २ वाजता पुन्हा पुढचा टप्पा सुरू होत असत. दुपारी ४ च्या सुमारास चहापान. ते झाल्यानंतर साधारण ६ वाजेपर्यंत पुन्हा प्रवास केल्यानंतर मुक्काम करत असत.

टॅग्स :Ashtavinayakअष्टविनायक गणपती