शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वडापावचे आमिष दाखूवन चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:55 IST

दोन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अटक

टिटवाळा : वडापाव आणि चायनिज खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून इयत्ता पाचवीच्या एका विद्यार्थिनीसह अन्य तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना टिटवाळा पोलिसांनी बुधवारी अटक केली. कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तंटामुक्त म्हणून घोषित केलेल्या या गावाला या कृत्यामुळे गालबोट लागले आहे. या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दोन्ही विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला.कल्याण तालुक्यातील टिटवाळ्याजवळ असणाºया एका तंटामुक्त गावातील शाळेत येथील पीडित अल्पवयीन मुलगी शिकायला होती. शाळेसमोरच्या मोकळ्या पटांगणात गावातील वडापाव विक्रेता माधव मगर (३७) आणि चायनिज खाद्यपदार्थ विकणारा विश्वनाथ तरणे (४०) हे व्यवसाय करत होते. शाळेतील पीडित मुलीला, तसेच गावातील अन्य तीन अल्पवयीन मुलींना वडापाव आणि चायनिज खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून ते दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते.३१ डिसेंबर रोजी पीडित मुलीने सतत होणाºया अत्याचाराची माहिती आईला दिली. त्यानुसार, तिच्या आईने या दोघांविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. टिटवाळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १ जानेवारी रोजी दोघांंविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी या आरोपींविरुद्ध बलात्कारासह पॉक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या आरोपींना बुधवारी कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.तंटामुक्त गाव म्हणून ओळखसंबंधित गाव तंटामुक्त असून, टिटवाळा पोलीस ठाण्यात या गावातील एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची गंभीर घटना समोर आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी दोन्ही आरोपींच्या गाड्यांची तोडफोडही केली.