शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील ६.६० लाख कर्मचाऱ्यांना लस, दोन वेळा दिला जाणार कोरोना लसीचा डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 00:41 IST

coronavirus news : कोरोनाच्या नवीन विषाणूने धडक दिली असली, तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ठाणे : कोरोनाची लस आता वर्षात येणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी महापलिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार आरोग्य सेवेतील अत्यावश्यक सेवेतील ठाण्यातील सुमारे ६ लाख ६० हजार लाभार्थ्यांची यादी पालिका प्रशासनाने तयार केली असून १३२ दिवसांमध्ये लसीकरणाचे दोन्ही टप्पे पार करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. लसींचा साठा वेळेत उपलब्ध झाल्यास चार महिन्यांत १३ लाख २० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.कोरोनाच्या नवीन विषाणूने धडक दिली असली, तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मोहिमेंतर्गत सुरुवातीला एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लाभार्थ्यांचे दोनवेळा लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार देशात ३३ कोटी, महाराष्ट्रात ५१ लाख तर ठाणे पालिका हद्दीत ६ लाख ६० हजार लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची योजना आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे पालिकेने त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. लसीकरणासाठी मुबलक जागा असलेल्या २० आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली असून त्यासाठी १०० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथक दिवसाला ५०० लस देणार आहे. म्हणजे ठाण्यात रोज १० हजार आणि आठवड्याला ७० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.सर्वप्रथम आरोग्य सेवकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी ६ लाख ६० हजार लाभार्थ्यांची यादी तयार आहे. लसींचा मुबलक साठा आल्यास १ लाख ८० हजार फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात येईल. फ्रंटलाइनमध्ये आयुक्तांपासून ते शासकीय, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.६ लाख ६० हजार लाभार्थ्यांचे दोन वेळा लसीकरण होणार आहे. म्हणजे १३ लाख २० हजार लसीकरणाचे मोठे आव्हान आहे. त्यातही एकाही लाभार्थ्याचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण चुकता कामा नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे