शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनच्या मच्छीमारांना व्यापाऱ्यांकडून  5 कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 16:21 IST

उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी  सभागृह नेते  रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली.

मीरारोड – उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी  सभागृह नेते  रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे . 

 भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्याला उत्तन , पाली , चौक भागातील मच्छीमार हे पिढ्यान पिढ्या पारंपारिकरित्या  मासेमारी व्यवसाय करतात. समुद्रातून मिळालेली मासळी प्रकारा नुसार वेगळी करून ओली मासळी किंवा मासळी सुकवून ती व्यापाऱ्यांना विकली जाते. परंतु, बरेच व्यापारी विश्वास संपादित करत चार - आठ दिवसांनी पैसे देतो असे सांगून विकलेल्या मासळीची पावती देतात  किंवा देत हि नाहीत. मासळीचे पैसे देण्याचे आश्वासन देऊन देखील वर्ष न वर्ष मच्छीमारांना पैसे दिले जात नाहीत . काही व्यापारी तर  उलट सुलट उत्तर देत तुम्हाला जे काही करायचे ते करून घ्या पैसे मिळणार नाहीत असे धमकावतात . 

मच्छीमारांचे कष्टाचे पैसे न मिळण्यामुळे अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून आर्थिक दृष्ट्या मच्छीमार मोठ्या संकटात सापडला आहे. अश्या फसलेल्या मच्छीमारांच्या सोबत सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी नुकतीच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली . या  वेळी पाटील यांनी व्यापाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीचे काही पुरावे देखील मांडले . व्यापाऱ्यांनी  फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा सुमारे ५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पाटील म्हणाले . डॉ. महेश पाटील यांनी, उत्तन सागरी पोलीस  ठाणे यांना योग्य चौकशी करून मच्छीमारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन  शिष्टमंडळास दिल्याचे रोहिदास पाटील म्हणाले . यावेळी उत्तन येथील स्थानिक शिवसेना नगरसेवक एलायेस बांड्या, कोळी समाज उत्तन संघटनेचे संचालक स्टीफन कासुघर, इंड्री गंडोली, दर्या माता चर्चच्या संजीना भंडारी व मच्छीमार आदी उपस्थित होते . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfishermanमच्छीमार