शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

कोरोना बाधीत रुग्णांसाठी कामगार हॉस्पीटलचा वापर करा, मनोज शिंदे यांचे महाापलिका आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 17:05 IST

एकीकडे ठाणे महापालिका शहरात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विविध ठिकाणी रुग्णालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र वागळे इस्टेट भागात, कामगार रुग्णालय हे तयार असतांना त्या ठिकाणी कोवीड रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केली आहे.

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून नवीन रुग्णालये उभारली जात आहेत. मात्र वागळे इस्टेट भागात कामगार हॉस्पीटल हे कोवीड रुग्णालय म्हणून का वापर केला जात नाही, असा सवाल कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आज शहरात विविध ठिकाणी मोकळी मैदाने इतर ठिकाणांचा शोध सुरु आहे. परंतु कामगार रुग्णालय हे अद्ययावत असल्याने त्याचा वापर तत्काळ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचा विचार केला गेला नाही तर कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.           ठाणे शहरात आजच्या घडीला पाच हजाराहून कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना आता रुग्णालये कमी पडू लागली आहेत. त्यामुळे, ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १ हजार खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. तसेच इतर ठिकाणी देखील मैदाने इतर जागांचा शोध सुरु आहे. परंतु हे सुरु होई पर्यंत रुग्णांची संख्या वाढणार आहे. तसेच, यासाठीचा खर्चही जास्तीचा आहे. त्यामुळे हा खर्च कोणासाठी, कोणाच्या फायद्यासाठी केला जात आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे अशा प्रकारे रुग्णालयाचा शोध घेतला जात असातांना वागळे इस्टेट भागात अद्ययावत असे कामगार रुग्णालय उभे आहे. चार मजली इमारतीत १ हजाराहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, कोरोनामुळे येथे इतर आजारांचे रुग्णही कमी संख्येत येत आहेत. येथे डॉक्टर आणि नर्सेस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासनाचा हा खर्च देखील वाचणार आहे. परंतु असे असतांनाही या रुग्णालयकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हेच रुग्णालय कोवीड रुग्णालय म्हणून वापरात आणता येऊ शकणार आहे. त्यामुळे याचा गांर्भीयाने विचार करुन हे रुग्णालय ताब्यात घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संपर्कमंत्री अस्लम शेख, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली जाणार आहे.                   याबाबतीत तत्काळ निर्णय व्हावा म्हणून त्याचे टिव्ट देखील केले असल्याचेही त्यांनी सांगितले. हे रुग्णालय कोवीड साठी का ताब्यात घेतले जात नाही, याची स्पष्टता करावी, हे रुग्णालय कोवीडसाठी केव्हा पर्यंत खुले होईल याचेही उत्तर त्यांनी मागितले आहे. या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा कॉंग्रेस स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही मनोज शिंदे यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस