शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील डाईंग सायझिंगमध्ये प्लास्टिक चिंध्यांचा सऱ्हास वापर; प्रदूषणामुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:03 IST

कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत .

नितिन पंडीत 

भिवंडी ( दि. ४ ) कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत . विशेष म्हणजे सध्या या डाईंग सायजिंग कंपन्यांच्या बॉयलारमध्ये प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून यामुळे शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनदेखील या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर समस्येकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत .  

  भिवंडी शहरात सुमारे सात लाख यंत्रमाग असून शहरात तब्बल ८० हुन अधिक सायझिंग कंपन्या आहेत . ज्यात ८० हुन अधिक बॉयलर असून ते २४ तास जळत असतात . या बॉयलर मध्ये दगडी कोळसा व लाकूड जळण्याचे आदेश असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षा मुळे अनेक सायझिंग बॉयलर मध्ये प्लास्टिक कचरा ,कपड्याच्या चिंध्या जाळण्यासाठी वापरत असल्याचे समोर येत आहे. या प्लास्टिक व चिंध्यांमुळे निर्माण होणारा धूर हा मानवास घातक ठरत असल्याने त्यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे विकार नागरीकांना जडत आहेत.भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्तीत या सायझिंग असल्याने त्याचा मोठा त्रास या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना होत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका प्रशासन या दोघांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वास्तविक या बॉयलर मध्ये जाळण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा १० रुपये किलो तर लाकूड ५ रुपये किलो ने मिळत असल्याची माहिती माल्ट असून त्यापेक्षा प्लास्टिक अवघ्या कचरा २ रुपये किलो दराने मिळत असल्याने स्वतः इंधनाच्या लालसेपोटी सायझिंग चालक या घातक प्लास्टिक व चिंध्यांचा वापर बॉयलर मध्ये करीत आहेत . हा प्लास्टिक जाळल्याने त्या पासून निघणार रासायनिक घटक असलेला धूर हा नागरीकां सह शहरातील पर्यावरणास मारक ठरत आहे.

विशेष म्हणजे भिवंडी सह ठाणे मुंब्रा ,कल्याण डोंबिवली येथील भंगार व्यवसायिकांची टोळी हा प्लास्टिक कचरा भिवंडी शहरातील सायझिंग चालकांना पुरवीत असून रात्री आठ ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान हे कृत्य केले जात असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक मनपा प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे काही डाईंग सायजिंग या शहरालगतच्या ग्रामीण भागात असल्याने तिथेही मोठ्या प्रमाणात बॉयलर मध्ये प्लास्टिक व कापडी चिंध्या जळाल्याचे प्रकार समोर येत आहेत . 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे