शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

राज्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर;आधार कार्डसाठी दुरुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:45 IST

वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर करून त्याद्वारे बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अशोक काठे (३०, रा. मोठागाव) आणि अनिल सिंदकर (७४, रा. कोपरगाव) यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली : वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर करून त्याद्वारे बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अशोक काठे (३०, रा. मोठागाव) आणि अनिल सिंदकर (७४, रा. कोपरगाव) यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.आधार कार्ड काढण्यासाठी काही नागरिकांना चव्हाण यांच्या नावे शिफारसपत्र दिले जात होते. मात्र, त्यासाठी त्यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर होत असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक राजन आभाळे यांना मिळाली होती. त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी आभाळे यांनी वैभव गवस याला आधार कार्ड बनविण्याच्या बहाण्याने संबंधित ठिकाणी पाठविले. त्यानुसार, वैभवने एका शिवसेना शाखेजवळ बसणाऱ्या सिंदकर याच्याशी संपर्क साधला. ‘मला आधार कार्ड बनवायचे आहे. पण, मी भाड्याच्या खोलीत राहतो. त्यामुळे माझ्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत,’ असे सिंदकरला त्याने सांगितले. त्या वेळी, ‘आधार कार्ड बनविण्यासाठी एक हजार रुपये खर्च होईल,’ असे सिंदकरने सांगितले.वैभवने ७ फेब्रुवारीला सिंदकरला हजार रुपये आणि दोन पासपोर्ट फोटो दिले. १० फेब्रुवारीला सिंदकर याने वैभवला फोन करीत पूर्वेतील रामनगर वाहतूक शाखेच्या पाठीमागील सायबर कॅफेमध्ये बोलावले. तेथे आधीपासूनच असलेल्या काटे याने आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चव्हाण यांच्या लेटरहेडवर वैभवचे ओळखपत्र स्कॅन करून दिले. या प्रकरणी वैभवच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड