शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग लायसन्स, रिक्षा परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर, ठाण्यात चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:41 IST

ठाणे :आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया चौघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून बनावट कागदपत्रे मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली.

ठळक मुद्देठाणे पोलिसांची कारवाईबनावट कागदपत्रे हस्तगतबनावट शिक्केही जप्त

ठाणे : वाहन चालविण्याचा परवाना आणि आॅटोरिक्षाच्या परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणार्‍या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणार्‍या टोळीची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. त्यानुसार १८ जानेवारी रोजी भिवंडी येथील धामणकर नाका येथील केजीएन संजरी आॅटो कन्सल्टंटवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी भिवंडी येथील गैबीनगरातील नफीज सगीर अहमद फारूकी (३८) आणि हापसन आळीतील नाजील नवाज अहमद मोमीन (२८) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, बनावट रहिवासी दाखला, रिक्षा परमीट आणि मोटार वाहन विम्याची कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरले जाणारे लॅपटॉप, संगणक आदी साहित्यही आरोपींकडून जप्त करण्यात आले. भिवंडीतील रहिवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन चालविण्याचा परवाना, बॅज आणि परमिट मिळवून देण्याचा धंदा आरोपी गत ४ ते ५ वर्षांपासून करीत आहेत.आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी भिवंडीतील निजामपुरा येथील मोहमद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी उर्फ पप्पु (३४) आणि शेलारगाव येथील संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी (४२) यांना अटक केली. मोहमद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी याच्या दुकानात संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून शाळा सोडल्याचे बनावट दाखले, डॉक्टरचा बनावट शिक्का, आरटीओ अधिकार्‍याचा शिक्का, बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीचा शिक्का आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपींविरूद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडून चारित्र्य पडताळणीचे ४५ बनावट दाखले, शाळा सोडल्याचे २0 बनावट दाखले, वाहन चालविण्याचे ४९ परवाने, ३ लॅपटॉप, ३ संगणक, ५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. याशिवाय आॅटोरिक्षा पासिंगच्या २११ फाईल्स, विम्याच्या ३९ फाईल्स आणि वाहन चालविण्याच्या परवान्याच्या ३४ फाईल्सही आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. या फाईल्स आरटीओ कार्यालयाच्या असून, त्या आरोपींजवळ कशा आल्या याचा तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस