शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अपर तहसीलदार कार्यालय त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:58 IST

कारभारही जेमतेम; लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ, दिव्यांग संतप्त

भाईंदर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आधी घाईगडबडीत कोणताही विचार न करताच भाईंदरच्या ९० फुटी मार्गावरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु केलेले अपर तहसीलदार कार्यालय नागरिकांसह ज्येष्ठ, दिव्यांग आदींना त्रासदायक ठरले आहे. लिफ्ट नसल्याने दोन मजले चढून जाणे अवघड जात असून या कार्यालयाचा कारभारही अजून जेमतेमच सुरू आहे.मीरा भार्इंदर महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र तहसीलदार कार्यालय असावे अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. विशेषत: विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी ठाण्याला सेतू कार्यालयात जावे लागत होते. नंतर मात्र नगरभवन येथील महसूलच्या कार्यालयात दाखल्यांची सुविधा करुन देण्यात आली. मात्र स्वतंत्र तहसीलदार कार्यालयाची मागणी पाहता विधानसभा निवडणुकीआधी सरकारने अपर तहसीलदार कार्यालयास मंजुरी दिली.महापालिकेने कार्यालयासाठी मध्यवर्ती तसेच लिफ्ट असलेली किंवा तळमजल्यावरची जागा देणे आवश्यक असताना भार्इंदर पश्चिमेस ९० फुटी मार्गावर उड्डाणपुलाजवळ असलेल्या इमारतीतील दुसºया मजल्यावरची पालिकेची जागा या कार्यालयासाठी घाईगडबडीत दिली गेली. कशाची काहीच सुविधा, दप्तर नसताना विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागायच्या आधी घाईगडबडीत या कार्यालयाचे उद्घाटन महापौर डिंपल मेहतांसह तहसीलदार अधिक पाटील, तत्कालिन आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, अपर तहसीलदार देशमुख व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आले. या कार्यालयाचे उद््घाटनाचे राजकीय श्रये घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यानंतर हे कार्यालय बंद असल्यासारखेच होते. कारण ठाण्याहून कागरदपत्रे आणली नव्हती. कार्यालयाचे नियजोन केले नव्हते, दाखले आदी देणे सुरु नव्हते. पुरेसा कर्मचारी वर्गही नव्हता. निवडणुकीनंतर आता ठाण्याहून कागदपत्रे आणण्यास सुरूवात झाली असली तरी अपर तहसीलदारांसह दोनच कर्मचारी आहेत. टपाल घेतले जात असून दाखले देण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. परंतु कार्यालय दुसºया मजल्यावर असून असलेले जीने उंच आहेत. तर लिफ्टही नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना तर जीने चढून जाणे अशक्य बनले आहे. त्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जीने चढून जाताना धाप लागते. त्यामुळे कामासाठी येणारे नागरिक संतापले आहेत. शिवाय दुसºया मजल्यावर कार्यालयाच्या ठिकाणचा येण्याजाण्याचा पॅसेजही अत्यंत अरूंद आहे. एखादी दुर्घटना घडल्यास कार्यालयातून बाहेर पडणेही अवघड ठरणार आहे.वास्तविक तळ मजला व लिफ्ट असेल, नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी पडेल अशी इमारत कार्यालय म्हणून निवडणे आवश्यक होते. मॅक्सस मॉलमागे तसेच मॅक्सस मॉलसमोर पालिकेच्या अशा सुविधा असलेल्या इमारती असूनही महसूल विभागाच्या या महत्वाच्या कार्यालयास मात्र पालिका आणि लोकप्रतिनिधींनी जागा दिली नसल्याचे नागरिक सांगतात. काहींनी तर जमिनीबाबत मोठ्या प्रमाणात व्यवहार करणाºया एका नेत्याच्या सोयीसाठी कनकिया भागात अपर तहसील कार्यालय नेण्याचा घाट असल्याचा आरोप केला आहे. पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अपर तहसीलदार देशमुख यांनी लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची गैरसोय होत असल्याने दुसरी जागा देण्यास पालिकेला कळवले असल्याचे सांगितले आहे.केवळ राजकीय फायदा लाटण्यासाठी कोणताही सारासार विचार न करता अशा अवघड ठिकाणी तहसीलदार कार्यालय सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरी, दिव्यांग, महिला, मुले आदींचा विचारच यांना करावासा वाटत नाही हे संतापजनक आहे. नागरिकांना मध्यवर्ती भागात सोयी असलेले कार्यालय पालिकेने तातडीने दिले पाहिजे.- जॉजफ घोन्सालवीस, माजी नगरसेवकउत्तन - चौकपासून ते काजूपाडा - पेणकरपाडा पर्यंतच्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे ठरेल अशा मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असले पाहिजे. तेथे तळ मजला वा लिफ्टची सुविधा असावी. आयुक्तांनीही नागरीकांना मध्यवर्ती ठिकाणी सोयीची व सुविधा असलेली इमारत तातडीने या कार्यालयासाठी दिली पाहिजे.- प्रताप सरनाईक, आमदार