शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

यूपीएमुळे इंधनदरवाढ नाही, माहिती अधिकारात उघड, भाजपाचे नेटीझन पडले उघडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 02:44 IST

क्रूड आॅइलखरेदीसाठी यूपीए सरकारने इराणकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज भाजपा सरकार फेडत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर महागले आहेत. ते कमी करता येत नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले नेटीझन करत आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : क्रूड आॅइलखरेदीसाठी यूपीए सरकारने इराणकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज भाजपा सरकार फेडत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर महागले आहेत. ते कमी करता येत नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले नेटीझन करत आहेत. याबाबतचे सत्य शोधण्यासाठी श्रीनिवास घाणेकर यांनी माहिती अधिकारात तपशील मागितला असता इंधनदरवाढीस यूपीए सरकार जबाबदार नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा प्रचारच पूर्णत: खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.क्रूड आॅइलच्या खरेदीच्या बदल्यात इराणला भारताकडून किती देणे बाकी आहे, असा तपशील माहिती अधिकारात या चळवळीतील कार्यकर्ते घाणेकर यांनी प्रथम केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे आॅनलाइनद्वारे विचारला. त्यावर त्या मंत्रालयाकडून माहिती देण्यास नकार आला. घाणेकर यांनी इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या महामंडळाकडे माहिती अधिकारात अर्ज केला. इंडियन आॅइल कंपनीने दोन देशांतील व्यापाराविषयीसंदर्भात असलेली माहिती देता येत नाही, असे कळवले. मात्र, इराणला कंपन्यांकडून काही देणे लागत नाही. अशा प्रकारचे कोणतेही थकीत कर्ज नाही, असे भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांनी घाणेकर यांना कळवले.घाणेकर म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात क्रूड आॅइलची किंमत प्रतिबॅरल १२५ ते १२७ डॉलर होती. त्यावेळी भारतात पेट्रोलचे दर प्रतिलीटरला ७० ते ७५ रुपये होेते. तर, डिझेलचे दर प्रतिलीटर ४० ते ४५ रुपये होते. यूपीए सरकारने पैशांची परतफेड केली नाही. त्यासाठी कर्ज घेतले. त्याविषयी विद्यमान भाजपा सरकारने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आतापर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा आलेला नाही. त्याचा साधा उल्लेखही लोकसभा व राज्यसभेत झालेला नाही. त्यामुळे यूपीए सरकारमुळे इंधनदरवाढ झाली, हा प्रचार मुळात चुकीचा आहे. हे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे.चुकीच्या प्रचारासाठी वापरभाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार प्रचार केला. त्यासाठी सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा वापर झाला. नेटीझनचे अनेक ग्रुप आहेत. एका नेटीझनला प्रतिएसएमएस करण्याच्या बदल्यात पैसे मिळतात.हजारो लोक एकाच वेळी मेसेज करतात. त्यामुळे एक मत तयार होते. याचा सर्रासपणे वापर चुकीच्या प्रचारासाठी केला जातो, याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलnewsबातम्या