शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगर यांच्यासोबत न केलेले चॅट मॉर्फ करून केले व्हायरल; आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:47 IST

वादग्रस्त चॅट व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांनी  सर्व बनाव असल्याचा दावा केला. ठोंबरे या वकील असूनही सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट व्हायरल केला. ३ वाजून ७ मिनिटांनी भाषण संपले आणि तीन वाजून २६ मिनिटांनी हा चॅट अवतरला, असे आव्हाड म्हणाले.  

ठाणे : शिवराज बांगर यांच्यासोबत न झालेले  व्हाॅट्सॲप चॅट मॉर्फ करून व्हायरल केले.  यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ॲड. रुपाली ठोंबरे यांची भूमिका हास्यास्पद असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.

वादग्रस्त चॅट व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांनी  सर्व बनाव असल्याचा दावा केला. ठोंबरे या वकील असूनही सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट व्हायरल केला. ३ वाजून ७ मिनिटांनी भाषण संपले आणि तीन वाजून २६ मिनिटांनी हा चॅट अवतरला, असे आव्हाड म्हणाले.  

धर्म, जातीद्वेषी मानसिकताच उघड  - चॅटवरील व्हॉट्सॲप डीपीवरही आपला फोटो नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. कितीही रागात असलो तरी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करीत नाही. - हे खोटे चॅट व्हायरल करताना ‘दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव,’ असे वाक्य आपल्या तोंडून निघाल्याचे दाखविले. - असे दाखवितानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्म, जातीद्वेषी मानसिकताच उघड झाली. त्याचबरोबर  दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली. दोन ते तीन वेळा त्याच्याशी बोलणे झाले, असे ते म्हणाले. 

स्वत:च्याच पायावर कुऱ्हाडआपल्या ज्या नंबरचा वापर मॉर्फ  चॅटिंगसाठी केला. तो नंबर साधा व्हॉट्सॲप आहे. ज्यांनी खोटी चॅट तयार केली त्यांनी या नंबरवरील व्हॉट्सॲप बिझनेस असल्याचे दाखविले. कोणाला  तरी खूष  करण्याच्या नादात स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि उघडे पडले, असेही आव्हाड पुढे म्हणाले. वाल्मीक कराडने जंग जंग पछाडलेबीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेडकर यांना भेटून संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. बांगरच्या कुटुंबीयांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्मीक कराडने जंग जंग पछाडले. बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलिसही त्याच्यावर गुन्हे नोंदवितात. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेRupali Chakankarरुपाली चाकणकर