शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Unlock: दुकानांना एक तर हॉटेल, रेस्टॉरंटना वेगळे नियम का?; अपेक्षित व्यवसाय होत नसल्यानं नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 06:53 IST

दुकानांची वेळ वाढवा, अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने, शोरूम सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली.

स्नेहा पावसकर ठाणे : अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, तरीही अपेक्षित फायदा होत नाही. आम्हाला दुकाने रात्री ९.३० ते १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. एकीकडे हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री ११ पर्यंत शहरात परवानगी दिली असताना आम्हा दुकानदार, व्यापाऱ्यांना वेगळा न्याय का, असा सवाल दुकानदारवर्गातून विचारला जात आहे.

अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने, शोरूम सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मात्र, कमी वेळात अपेक्षित व्यवसाय होत नसून गेल्या अनेक महिन्य­ांत आमचे नुकसान झाले आहे. त्यातच सामान्य माणसाला खरेदी करण्यासाठी दुकाने अधिक वेळ खुली ठेवली, तर सोयीचे ठरू शकते. जर हॉटेल, बारना परवानगी मिळू शकते, तर मग दुकानदारांनाही रात्री ९.३०-१० पर्यंत वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.वेळ वाढवण्याबाबत ठामपाने निर्णय घ्यावाव्यापारी, दुकानदारांना एक न्याय आणि हॉटेलना दुसरा न्याय, हे चुकीचे आहे. दुकाने सुरू ठेवण्याबाबत, त्यांना वेळ वाढवून देण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्वराज इंडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.रात्री ९ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्या - केळकरएकीकडे बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री ११.३० पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र, व्यापारी-दुकानदार आणि आस्थापनांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ दिल्याने व्यापारीवर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे. ही दुकाने किमान रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहक साधारणपणे ५ ते ९ च्या दरम्यान येतात. मात्र, आता ७ वाजता दुकाने बंद होऊ लागल्याने ६ ते ७ च्या दरम्यान बाजारात गर्दी होते. यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्याने ग्राहक छोटीमोठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि व्यापाऱ्यांचा विचार करता वेळ वाढवावी. - आशीष शिरसाठ,वरिष्ठ उपाध्यक्ष, ठाणे व्यापारी महासंघ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका