शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हान देत अज्ञाताकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 10:47 IST

या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केला आहे.

ठाणे: जगभराच्या मुस्लिमांची माफी मागा असे आव्हान देत एका हॅकर टीम ने थेट ठाणे शहर पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला आहे. या प्रकारामुळे ठाणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.मंगळवारी सकाळी ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेल विभागा च्या सोशल मीडिया युनिटचे काही कर्मचारी नेहमीप्रमाणे ठाणे पोलिसांच्या कामगिरीचे फोटो अपलोड करण्यासाठी गेले. त्यावेळी वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर “ असा या हॅकर टीमचा उल्लेख होता. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केला आहे.

ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे वृत्त खरे असले तरी ते कोणी आणि का केले याचा शोध घेण्यात येत असल्याचे सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलम वाव्हळ यांनी लोकमत ला सांगितले. जगभरातील मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हानही यात केले होते. संकेतस्थळ पुनर्जीवित केल्यानंतर मात्र हा संदेश नष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सदर संकेतस्थळ पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी सायबर तज्ञांची मदत घेतली जात आहे. सायबर सह गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांकडून हॅकरचा शोध घेतला जात आहे. हॅकर्स ग्रुपने ठाणे पोलिसांचेच संकेतस्थळ कोणत्या उद्देशाने  हॅक केले हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइमthaneठाणे