शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय ग्रामविकासमंत्री २५ आॅगस्टला विहिगावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 05:30 IST

सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्यातील विहिगाव दत्तक घेतले आहे.

ठाणे : सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्यातील विहिगाव दत्तक घेतले आहे. या गावास केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर २५ आॅगस्टला भेट देणार आहेत. तत्पूर्वी या गावातील सोयीसुविधांसह विविध स्वरूपांच्या विकासकामांचा आढावा सहस्रबुद्धे यांनी जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी घेतला.सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहापूरच्या विहिगाव या अतिदुर्गम भागातील व डोंगरपठारावरील गावाची निवड त्यांनी केली आहे. या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आता हे गाव जगाच्या संपर्कात आले आहे. याप्रमाणेच या गावाच्या ग्रामविकास आराखड्यात मंजूर असलेल्या ६८ कामांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासमवेत त्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सादरीकरण करून क्षेत्रनिहाय विविध कामांच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. प्रस्तावित आराखड्यातील सुमारे ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे २० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.गावातील विकासकामांच्या समारोपाचा कार्यक्रम येत्या २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर तसेच शहापूरचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.>जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारीडॉ. महेंद्र कल्याणकर विहिगावच्या सोईसुविधांसह विकासकामांचा आढावा घेताना दिसत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे