शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तलावात पोहण्यास गेलेल्या दोघा लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

By नितीन पंडित | Updated: February 7, 2023 17:52 IST

भिवंडी तालुक्यातील सावंदे गावातील तलावात खेळण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे .या घटने नंतर परिसरात शोककळा पसरली आहे .

भिवंडी-भिवंडी तालुक्यातील सावंदे गावातील तलावात खेळण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे .या घटने नंतर परिसरात शोककळा पसरली आहे .

भिवंडी शहरा नजीक असलेल्या गोरसई या गावातील चाळीत राहणारे सिमरान इम्रान खान वय १२ व धीरज सुरज मिस्त्री वय ८ हे दोघे ४ फेब्रुवारी सायंकाळ पासून खेळायला गेले होते.रात्र झाली तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेऊन ही ते आढळून आले नाहीत.त्यानंतर रात्री उशिरा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची खबर दिली.

दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोध घेण्यास सुरुवात केली.पोलिसांसह स्थानिक पोलीस पाटील व जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने  संपूर्ण परिसर पिंजून काढला.निर्जन स्थळ,संडास टाक्या, पाण्याच्या टाक्या या ठिकाणी सतत दोन दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती साईनाथ पाटील यांनी दिली.त्यानंतर सोमवारी दुपारी तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना तलावाकाठी या मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.तालुका पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात पाठवून या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.या घटने नंतर गोरसई परिसरात शोककळा पसरली आहे .

टॅग्स :thaneठाणे