शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:56 IST

लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली...

ठाणे :  डबल इंजिन सरकार राज्यात बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ आरोप करण्याचेच काम ते करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाण्यात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सदाभाऊ खोत आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. 

राज्यातील बंद झालेले प्रकल्प सुरू झाले आहेत. गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्याने आता नवनवे उद्योजक त्या ठिकाणी उद्योगांसाठी येत आहेत. त्यातून तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटविण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्यात येत आहे. आम्ही राम मंदिर बांधले, परंतु त्याचे राजकारण केले नसल्याचे सांगत ‘मुखी राम आणि प्रत्येकाला काम’ असे आमचे  सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

कौशल्य विकास प्रबोधिनीचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोपरीतील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून घरघंटी आणि शिलाई मशीनच्या ११ हजार लाभार्थींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते वाटप  केले. ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे (हिट ॲक्शन प्लॅन) उद्घाटनही यावेळी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र स्कोअर कार्ड उद्योजकता आणि महिला उद्योजक धोरण अहवाल याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा