शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

APMC Election Result 2023 : मुरबाड बाजार समितीत शिवसेनेचा निर्विवाद विजय

By सुरेश लोखंडे | Updated: April 29, 2023 18:21 IST

APMC Election Result 2023

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :  मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी)APMC Election Result  निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून १८ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळाला. यामुळे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला असून, भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे  सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील या पँनलने मुरबाड `एपीएमसी'वरनिर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मुरबाडच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून गोटीराम पवार यांचे वर्चस्व आहे. आता त्यांची ही धुरा  चिरंजीव सुभाष पवार यांनी घेतली आहे. २००९ नंतर मुरबाडच्या राजकारणात पदार्पण केलेले किसन कथोरे यांना आमदारकी हाती असूनही चौदा वर्षानंतरही  एपीएमसीवरील गोटीराम पवारांचे वर्चस्व मोडता आलेले नाही. आतापर्यंत बाजार समितीच्या झालेल्या सर्व निवडणुकात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत राज्यात शिवसेना व भाजपा एकत्रित असल्यामुळे मुरबाड एपीएमसी निवडणुकीत युतीची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात शिवसेना-भाजपामध्ये चर्चाही झाली होती. शिवसेनेने भाजपाला सहा जागा देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. भाजपाने सुरुवातीला सहा जागांवर मान्यता दिली. मात्र, अचानक आणखी एका जागेची मागणी केल्यामुळे युती फिसकटली.

`एपीएमसी'ची निवडणूक चुरशीची होत असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. मात्र, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांनी नियोजनबद्ध व्यूहरचना केली. त्यामुळे भाजपाला संधी मिळाली नाही. या मतमोजणीत शिवसेनेच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेला १८ पैकी १५, तर भाजपाचे कथोरेंना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :APMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक