शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:31 IST

जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : नाणार, जैतापूर प्रकल्पांना होणारा विरोध हा समजून घेतला पाहिजे. कोणताही मोठा प्रकल्प येतो, त्या वेळी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण केले जात असल्याने लोकांच्या जीवनावरच अतिक्रमण होते. लोकांचा अनुभव बऱ्याच ठिकाणी फारसा चांगला नाही. जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सहयोग मंदिर येथे ‘भेट दिग्गजांची’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. काकोडकर यांची जाहीर मुलाखत झाली. डॉ. काकोडकर म्हणाले की, जैतापूर प्रकल्पाला एक लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नाणार प्रकल्पाला देखील अशा प्रकारची गुंतवणूक आहे. यात मात्र बाहेरच्या लोकांचा आणि स्थानिकांचा किती फायदा होतो, यातून समाजात तेढ निर्माण होते. कोणत्याही प्रकल्पाबाबत समाजप्रबोधन आधी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ली प्रकल्पांना विरोध करायलादेखील कोट्यवधी रुपये वाटले जातात. प्रकल्पांमुळे समाजावर परिणाम होतो हे नक्की, पण तो सकारात्मक व्हावा, स्थानिकांना हा प्रकल्प पटला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण तसे नाही ज्याने चांगला परिणाम होईल, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण, ज्येष्ठराज जोशी, सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वैष्णो व्हिजनचे जयू भाटकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आदी उपस्थित होते.

समाजमनात अणुशक्तीबाबत खोलवर भीतीआजही अणुशक्तीबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठी स्थित्यंतरे होतात तेव्हा असे गैरसमज निर्माण होत असतात. अणुशक्तीची ओळखच हिरोशिमा, नागासाकीपासून झाल्याने गैरसमज आहे. अणुशक्तीतून वीजनिर्मिती व अनेक फायदे लोकांसमोर नंतर येतात. त्यामुळे समाजमनात अणुशक्तीबाबत भीती खोलवर दडली आहे. जग पुढे बदलणार आहे. त्यामुळे आणखी ऊर्जा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे