शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
6
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
7
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
8
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
9
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
10
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
11
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
12
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
13
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
14
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
15
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
16
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
17
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
18
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
19
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
20
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:18 IST

जि.प.चा गौरव : भिवंडी, कल्याण सर्वोत्तम

ठाणे : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी म्हणून असलेली प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाने राज्यात प्रथम क्र मांक मिळवला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे.

मोठ्या संख्येने घरकुले पूर्ण करणाºया राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक मिळवला. यामुळे १ सप्टेंबर रोजी सिडको भवन, सभागृहामध्ये राज्याचे ग्राम विकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतील या कामिगरीची दखल घेऊन घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा हा गौरव ग्रामविकास सचिवांच्या हस्ते पार पडणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाºया शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जात आहेत.या योजने अंतर्गत २०१६-१७ वर्षा करिता जिल्ह्याला तीन हजार ३९९ लक्षांक दिले होते. त्यापैकी तीन हजार १४६ पूर्ण केले. तर २०१७ - १८ करीता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधली. २०१८ - १९ करीता दिलेल्या ४६२ लक्षांकापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली असून पहिला हप्ताही दिल्याचा दावा आहे.शासकीय यंत्रणा सज्जच्प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत.च्२०१७ -१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.521घरकूल पूर्ण443घरांना मंजुरी

टॅग्स :thaneठाणेHomeघरPMRDAपीएमआरडीए