शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

कुठल्याही परिस्थितीत रस्ता रुंदीकरण होणारच!

By admin | Updated: January 14, 2017 06:26 IST

मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी जागा घेण्याचा प्रयत्न पालिकेने पुन्हा केला असता नागरिकांनी विरोध केला. आयुक्तांनी राजकारणी नको, असे सांगत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यासह पालिका प्रभाग समितीचे अध्यक्ष, गटनेते यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. केवळ दुकानदारांशी चर्चा करत ती जागा पालिकेची असून ताब्यात घेणारच, असे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी भाजपा युतीने शांतीनगरमधील प्रभाग ३६ पूर्ण व ३८ अंशत: अटल आदर्श वॉर्ड योजनेत समाविष्ट केले आहे. या योजनेनुसार पूर्वीचा असलेला सुमारे ४० फूट रस्ता आणखी रुंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी पालिकेने इमारती व दुकानांसमोर असलेली जागा ताब्यात घेऊन त्यानुसार गटार बांधकामासाठी खोदकाम चालवले आहे. परंतु, येथील दुकानदारांचा विरोध असून गेल्या महिन्यात सेक्टर ५-६ दरम्यान रस्ता रुंदीकरणास गेलेल्या पालिका पथकाचे काम नागरिकांनी बंद पाडले होते. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन आंदोलनात उतरले होते. दरम्यान, गुरुवारी पालिकेने सेक्टर-४ मधील रस्ता रुंदीकरण हाती घेतले. त्यावेळीही दुकानदारांनी विरोध करत काम थांबवले. पालिकेचे तसेच नयानगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरकारी कामात अडथळा आणू नका,असे पोलीस सांगत होते. तर, पालिकेच्या जमिनीच्या मालकीचा ७/१२ दाखवा, असे दुकानदारांनी सांगितले. काही वेळातच स्वत: हुसेन यांच्यासह सभापती प्रमोद सामंत, काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी, शफिक खान तेथे आले. त्यांनीही आधी फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढा, असे पालिका व पोलिसांना सुनावले. पालिकेच्या नावे जागाच नसून सरकारनेही अहवाल मागवला आहे. असे असताना पालिकेने आवश्यकता नसताना नियम धाब्यावर बसवून दडपशाही सुरू केली आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. तर, कोट्यवधी रुपयांच्या कामातील टक्केवारी व विकासकाला आणखी चटईक्षेत्र मिळावे, म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला. दरम्यान, आयुक्तांना सायंकाळी हुसेन यांच्यासह नागरिकांचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले असता आयुक्त गीते यांनी शांतीनगर रस्तारुंदीकरण विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी केवळ दुकानदारांना बसवून त्यांच्याशी चर्चा केली. फेरीवाल्यांना हटवले तरी रस्ता मोकळा होईल, अशी दुकानदारांनी आपली भूमिका मांडली. पण, आयुक्तांनी जागा पालिकेची असूनरुंदीकरण होणारच, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)