शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली कंत्राटी मजुरांचे पगारासाठी आयुक्त दालना बाहेर ठिय्या आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 20:48 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटनेने उदद्यान विभागातील कंत्राटी मजुरांसह आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केले.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटनेने उदद्यान विभागातील कंत्राटी मजुरांसह आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यां पासुनचा पगारच या मजुरांना मिळाला नसल्याने ते संतप्त झाले होते. अखेर आयुक्तांनी ठेकेदाराचे पगारा पोटीची अडकलेली देयके तत्काळ देण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने मंगळवारी सकाळी पगार खात्यात पडण्याच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मीरा भार्इंदर महापालिकेच्या उद्यान विभागात सुमारे ३६० कंत्राटी मजुर काम करतात. महापालिकेची उद्याने, खेळाची मैदाने, स्मशानभूमी, चौक, रस्ते दुभाजक देखभाल आदींसह झाडांची छाटणी वगैरे कामं हे मजुर करत असतात. परंतु आधीच्या ठेकेदारास बाजुला करत मर्जीतील सैनिक सिक्युटीरी या ठेकेदारास परस्पर नियमबाह्यपणे मजुर पुरवठ्याचा ठेका देण्यात आला. त्यातुनच परस्पर नेमलेल्या ठेकेदारा मार्फत उद्यान विभागातील कंत्राटी मजुरांचे वेतन कसे काढायचे ? असा पेच निर्माण झाला.परंतु सदर मजुर श्रमजीवी कामगार संघटनेचे सदस्य असल्याने त्यांना पगार पालिका ठेकेदारा मार्फत काढुन देत आली आहे. परंतु मे व जुन महिन्याचा पगार न केल्याने संघटनेने ठेकेदारास या बाबत विचारणा केली असता पालिकेने चार महिन्याच्या वेतनाची रक्कमच दिली नसल्याचे स्पष्ट केले. पालिकेने मजुरांच्या पगाराची रक्कम न दिल्याने ठेकेदाराने देखील मजुरांना पगार देणे शक्य नसल्याचे कळवले होते.पगारासाठी आज सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वा खाली मजुरांनी पालिका मुख्यालयात आयुक्त दालना बाहेर पगारासाठी ठिय्या आंदोलन केले. मजुरांनी ठिय्या मारल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. आयुक्त दालनच जाम करुन टाकण्यात आले. घोषणांनी पालिका दणाणुन सोडली. दोन महिन्यां पासुन आम्हाला कष्टाचा मोबदला मिळालेला नाही असे सांगत आमच्या कुटुंबियांनी जगायचे तरी कसे ? असा सवाल या मजुरांनी केला.आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तातडीने पालिका अधिकारायांसह श्रमजीवी कामगार संघटनेचे यूनिट अध्यक्ष चेतन पाटील, उपाध्यक्ष मंगेश मोरे , हरेष शीप्रे , विकास पाटील, गिरीष पाटील , रमेश गोरेकर , दीपक पाटील , दिगंबर मेहर आदी दालनात चर्चेसाठी बोलावले. ठेकेदाराच्या व्यवस्थापकास सुध्दा पाचारण केले.महापालिका प्रशासन ठेकेदाराची देयके अडवत असल्याचे यातुन समोर आले. पालिकेत देयके मंजुर करण्यासाठी चालणारी टक्केवारी याची कुजबुज झाली. तर ठेकेदारच त्याच्या देयकांसाठी पाठपुरावा करत नाही. त्याने पाठपुरावा केला पाहिजे असा कांगावा प्रशासना तर्फे केला गेला. आयुक्तांनी मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे यांच्या सोबत जाऊन मजुरांच्या पगाराच्या प्रलंबित देयकांवर सह्या घेण्यास सांगीतले. त्या नंतर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हे ठेकेदारा सोबत अधिकारायां कडे गेले व प्रलंबित देयकांवर सह्या घेतल्या. परंतु दुपार नंतर बँक बंद झाल्याने मंगळवारी सकाळी मजुरांचा पगार खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर