शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात एटीएसने माहिती दिल्यानंतर मीरारोडमधील अनधिकृत दूरध्वनी केंद्र पोलिसांनी केले उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 18:55 IST

केंद्रातून परदेशात मोठ्या प्रमाणात कॉलची देवाण घेवाण होत होती असे समोर आले आहे.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागात पूजा नगरमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर दूरध्वनी केंद्राची गुजरात एटीएस कडून माहिती मिळताच गुन्हे शाखेने धाड टाकून सदर केंद्र उध्वस्त केले असून एकास अटक केली आहे. या केंद्रातून परदेशात मोठ्या प्रमाणात कॉलची देवाण घेवाण होत होती असे समोर आले आहे.

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष १ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास जयवंत टोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी नया नगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुजराथ राज्याचे ए.टी.एस.चे पालीस अधीक्षक परमार यांनी माहिती दिली कि , मीरारोडच्या नया नगर भागात पूजा नगरच्या एन. जी. प्लाझा मध्ये राहणारा सज्जाद सय्यद हा त्याच्या घरातून अनधिकृतपणे दूरध्वनी केंद्र चालवत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सह सपोनि टोकले, पोलीस कर्मचारी एम.के.वेदपाठक, संतोष लांडगे, विजय गायकवाड, सुमित जाधव, भरोसा सेलच्या महिला पोलीस शिंदे यांच्या पथकाने सज्जाद याच्या घरावर बुधवारी दुपारी धाड टाकली . त्यावेळी सज्जाद हा त्याचा गुजरातच्या जुनागढ भागातील मांगरूळ येथील साथीदार सय्यद शाहिद लियाकत अली सह अनधिकृतपणे दूरध्वनी केंद्र चालवत असल्याचे आढळून आले . पोलिसांनी दोघां विरोधात गुन्हा दाखल करून सज्जादला अटक केली आहे.

अर्थिक फायद्याकरीता इंटरनेटद्वारे परदेशातुन येणारे अंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल  हे त्यांच्याकडील उपकरणाद्वारे बीएसएनएल कंपनीच्या सिमकार्ड द्वारे भारतातील ईच्छित मोबाईल नंबरवर अनाधिकृत रित्या राऊट करुन देत होते .  स्थानिक मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांचे तसेच भारत सरकारचे अर्थिक नुकसान करण्यासह देशाच्या सुरक्षितेला धोका निर्माण होत असल्याचे गुन्ह्यात नमूद आहे. 

पोलिसांनी घटनास्थळा वरून ३२ स्लॉटचे २ सिम बॉक्स , राऊटर , बीएसएनएलची १६ तर एअरटेल व वोडाफोन ची प्रत्येकी ७ सिमकार्ड असा ३ लाख ४२ हजार रुपयांचे यंत्र साहित्य जप्त करण्यात आले आहे . गेल्या तीन महिन्या पासून तो हे बेकायदा केंद्र चालवत असल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे . त्याचा साथीदार सय्यद शाहिद अली याचा शोध पोलीस घेत आहेत . या अनधिकृत दूरध्वनी केंद्रातून कुठून व कोणाचे कॉल केले गेले याचा शोध घेतला जाणार आहे . या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक कुराडे हे अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस