शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ठाण्यात होर्डिंगचे अनधिकृत मनोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:14 IST

भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आर्शिवादाने मृत व्यक्तीच्या नावे बेकायदेशीर एनओसी; कंत्राटदाराचा गोलमाल मनसेने आणला चव्हाट्यावर    

ठाणे, दि. २३ (प्रतिनिधी) : तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची नवी ओळख अनधिकृत होर्डिंग्जचे शहर अशी होत आहेत. ठाणे पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मृत व्यक्तींच्या नावे बेकायदेशीर एनओसी घेत उंचच उंच होर्डिंगचे मनोरे शहरात उभे राहत आहेत. कंत्राटदारांच्या साथीने सुरू असलेला हा गोलमाल मनसेने चव्हाट्यावर आणला असून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मे- एवन इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठाणे शहरातील आनंदनगरच्या परबवाडी येथील जाहिरात फलकास आपल्या परवानगी देताना कागदपत्रांची पडताळणी जाणीवपूर्वक योग्यरित्या केली नाही. या अनधिकृत जागेचे मालक महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानुसार श्रीनिवास गुडाब्बा हे आहेत. माञ मे- एवन इंटरप्रायजेस कंपनीने नाहरकत प्रमाणपत्र सादर करताना रामचंद्र सदाशिव परब आणि वामन सदाशिव परब यांचे २००३ साली निधन झालेले असताना मालकी दाखविण्यासाठी सदाशिव परब यांच्या नावे खोट्या सह्या केल्याचे समोर आले. त्यामुळे भविष्यात जागेच्या मालकी संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास महापालिकेने परवानगी देताना निष्काळजीपणा केला म्हणून पालिकेचे नाव धुळीला मिळेल. तसेच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेची फसवणूक केली जात असल्याचा संशय त्यामुळे बळावत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.

* नियमांची पायमल्ली  *अनधिकृत मालमत्ता म्हणून महापालिकेकडे नोंद असलेल्या जागेवर अधिकृत जाहिरात फलक उभारता येत नाही. तसेच रस्त्यापासून 40 फूटपेक्षा अधिक उंचीवर संबंधित होर्डिंग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. एकीकडे ठाण्याचे महापौर अनधिकृत बांधकामांवर ताशेरे ओढत असताना त्यांच्याच प्रभागात अनधिकृत होर्डिंगचे मनोरे उभे राहत असताना अशा कामांकडे डोळेझाक होत असेल तर सर्वसामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न मनसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका