शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर गोळीबार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 21:48 IST

बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या टोळीतील शाहरुख सय्यद (२२) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधून अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईहल्लेखोरांना पुरविले शस्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाºया टोळीतील शाहरुख सय्यद (२२, रा. इंदिरानगर, कल्याण) या आणखी एका आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधून अटक केली आहे. त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.बांधकाम व्यावसायिक गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया हितेश ठाकूर (२३) आणि सागर शिंदे (२३) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने यापूर्वीच नाशिक येथून २३ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबूली या दोघांनी पोलिसांना दिली. २२ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर मधील श्रीराम चौकातील एका बार मधून संदीप आणि त्यांचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या या हितेश याच्यासह दोघांनी गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात संदीप हा गंभीर जखमी झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने आधी हितेश आणि सागर यांना अटक केली. त्यापाठोपाठ त्यांना हत्यार पुरविणारा त्यांचा तिसरा साथीदार शाहरुख याला २९ आॅक्टोबर रोजी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfireआग