शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरचे खड्डे १३ कोटींवर!, १३५ टक्के वाढीव दराची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:01 IST

उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे. या कामाची निविदा १३५ टक्के वाढीव दराने आल्याने स्थायी समितीत जोरदार टीका झाली. सभापती कांचन लुंड यांच्यासह आयुक्त निंबाळकर व विविध पक्षांच्या नेत्यांनी या निविदेला विरोध केला आहे. दरम्यान, महापौर मीना आयलानी, आ. बालाजी किणीकर यांच्यामुळे खड्ड्यांच्या दुरूल्तीचा खर्च वाढल्याचा आरोप करत ते खलनायक ठरल्याचा ठपका युवा नेता संतोष पांडे यांनी ठेवला.उल्हासनगरची रस्ता दुरूस्ती आणि खड्डे भरण्याचे काम गणेशोत्सव, चालिया उत्सव आणि नवरात्रोत्सवापूर्वी व्हावे, अशी मागणी सर्व पक्षांकडून झाल्याने स्थायीने अत्यावश्यक कामाच्या नावाखाली साडेचार कोटीचा ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तो दोन ठेकेदारांना विभागून दिला. त्याला सोशल मीडियावर विरोध झाला. महापौर मीना आयलानी व आ. बालाजी किणीकर यांनीही निविदा न काढता साडेचार कोटीचा ठेका अत्यावश्यक कामाअंतर्गत देण्याला विरोध केला. अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठेका रद्द करून फेरनिविदा काढण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.रस्ता दुरस्ती व खड्डे भरण्याच्या निविदेत आणखी काही रस्त्याचा समावेश करून पाच कोटी ६५ लाखांची फेरनिविदा काढण्यात आली. त्याला १३५ टक्के वाढीव दराने प्रतिसाद मिळाला आणि निविदा थेट १३ कोटी ५० लाखांवर गेली. तिला महापौर मीना आयलानी, आ. बालाजी किणीकर, उपमहापौर राजू इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, विरोधी पक्षनेता रमेश चव्हाण यांनी विरोध करत ठेकेदाराच्या मनमानीपणावर टीका केली. आयुक्तांनीही नाराजी व्यक्त करून चौकशीचे आश्वासन दिले. मात्र गणेश उत्सवादरम्यान २४ लाखाच्या निधीतून तात्पुरते खड्डे भरण्यास अत्यावश्यक कामाखाली परवानगी दिली.महापौर मीना आयलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधामुळेच साडेचार कोटींचा रस्ता दुरस्ती व खड्डे भरण्याचा ठेका १३ कोटी ५० लाखांवर गेल्याचा आरोप युवा नेता संतोश पांडे यांनी केला. त्यांनी कामाला विरोध केला नसता, तर रस्ते चकाचक असते. तसेच बाप्पाचे आगमन व निरोप चांगल्या रस्त्यातून झाले असते, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Potholeखड्डे