उल्हासनगर : जुन्या रागातून एका इसमाचा डोळ्यात मिरची पावडर टाकून चाकू व चॉपरने वार केले. तसंच घरात कोंडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण योग्यवेळी पोलीस गेल्याने इसमाचा जीव वाचला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कॅम्प नं-2 हनुमाननगर परिसरात नितीन उर्फ बापू शिंदे कुटुंबासह राहतो. बुधवारी सकाळी 8 वाजता मित्राकडे लग्नाचा आहेर घेऊन ती जात होता. त्यावेळी जुन्या रागातून शिंदे याला बाबूलाल कुलाल व सहकाऱ्यांनी अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच त्याला एका घरात नेऊन संजू कुलाल, बाबूलाल कुलाल, रामपरवेज गुप्ता, शिशिकांत कुलाल, संतोष कुलाल, सोनू कुलाल आदींनी कोयता व चॉपरने सपासप वार केले. त्यावेळी रेणुका नावाच्या महिलेने नितीन शिंदेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळन्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नितीन शिंदे याला घरात कोंडून जिवंत मारण्याचा पर्यंत केला जात असल्याची माहिती एका महिला पोलिसांना सांगितल्याने, वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नितीन याला घरातून बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान, नितीन शिंदे यांच्या तक्रारीवरून संजू कुलाल, बाबूलाल कुलाल, रामपरवेस गुप्ता, शिशिकांत कुलाल, संतोष कुलाल, सोनू कुलाल, रेणुका यांच्यासह काही इसमावर गुन्हा दाखल केला असून 4 जणांना अटक केली. सदर प्रकार दारूच्या धंद्याच्या वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगरात जुन्या रागातून कोयता व चॉपरने वार, घरात कोंडून जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 18:10 IST