शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

उल्हासनगर महापालिकेची शाळा भरते टेरेसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:47 IST

महापालिका शाळा क्रमांक १८ व २४ मधील तब्बल ९५० विद्यार्थी एका खाजगी शाळेच्या टेरेसवर धडे गिरवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक १८ व २४ मधील तब्बल ९५० विद्यार्थी एका खाजगी शाळेच्या टेरेसवर धडे गिरवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुनर्बांधणीसाठी शाळा इमारत जमीनदोस्त केली असून, आयुक्तांनी बांधकाम परवानगीही रद्द केल्याने इमारतबांधणीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळ नेहमी वादात राहिले असून, मंडळातील अनेक निविदांच्या चौकशीची मागणी वेळोवेळी झाली आहे. यापूर्वीच्या प्रशासन अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाल्याने, शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी म्हणून कायमस्वरूपी काम करण्यास कोणी धजावत नाही. गेल्यावर्षी महापालिका शाळा क्रमांक १८ व २४ च्या इमारत पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शाळेतील ९५० विद्यार्थ्यांना पुरेशी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व पालिकेची आहे.प्रत्यक्षात तसे झाले नाही. उन्हाळी सुटीत विनापरवाना शाळा इमारत पालिकेने जमीनदोस्त केली. त्यानंतर मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शेजारील खाजगी एसईएस शाळेच्या इमारतीत हलविण्यात आले. त्याठिकाणी पुरेसे वर्ग उपलब्ध नसल्याने, इमारतीच्या टेरेसवर कापडी छत टाकून त्याखाली शाळा भरविण्यात येत आहे.खाजगी शाळेच्या टेरेसवर भरविण्यात येत असलेल्या या शाळेतील मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून महापालिकेने पुरेशी जागा वर्गासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.टेरेसवरून एखादे मूल पडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शाळा इमारतीचे काम ठेकेदाराने सुरू केल्यावर सदर इमारत नवीन विकास आराखड्यानुसार लिंक रोडवर येत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या आहेत.आयुक्तांनी शाळा इमारतीचा परवाना रद्द केल्याने, शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. शाळा इमारत नवीन विकास आराखड्यात लिंक रस्त्यावर येत असल्याचे माहिती असून इमारत बांधकाम परवाना दिला कसा, शाळेची इमारत कोणाच्या आदेशान्वये पाडली, आदी अनेक प्रश्न निर्माण झाले. हिंदी माध्यमाची मुले महापालिका शाळा क्रमांक ३ मध्ये हलविणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली आहे. मात्र शाळा लांब असल्याने अनेक विद्यार्थी शाळा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्व काही ठेकेदारासाठीमहापालिका शाळा इमारत पुनर्बांधणीचा घाट फक्त ठेकेदाराच्या भल्यासाठी घातला जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे. यापूर्वीची शाळा इमारत पुनर्बांधणी वादात सापडली असून, त्याच्या चौकशीची मागणीही होत आहे.ठेकेदाराच्या फायद्यासाठी पुनर्बांधणीच्या आड शाळा इमारत पाडून ९५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून, आयुक्तांनी यातून मार्ग काढण्याची, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र