- सदानंद नाईकउल्हासनगर - प्रभाग क्रं-१५ मध्ये उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांच्या विरोधात शिंदेसेनेचे उपजिल्हाधिकारी अरुण अशान उभे ठाकले. तर प्रभाग क्रं-१७ मधून शिंदेसेनेचे शहरप्रमुख रमेश चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री व भाजपचे अमर लुंड यांच्या बिग फाईट रंगणार आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रं-१५ व १७ मधील बिग फाईटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्रं-१५ वर बोडारे बंधुचे वर्चस्व राहिले असून गेल्या महापालिका निवडणुकीत धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, शीतल बोडारे व संगीता सपकाळे नगरसेवक पदी निवडून आले होते. उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेले बोडारे यांनी ऐण निवडणूकीपूर्वी भाजपात प्रवेश घेतला. त्यांच्या विरोधात शिंदेसेनेचे उपजिल्हाधिकारी अरुण अशान यांनी दंड थोपटले आहे. अशाण यांनी बोडारे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला असलातरी, अशान स्वतः प्रभाग क्रं-१४ मध्ये राहत असून त्यांच्या आई लीला अशान निवडणूक रिंगणात असून त्या दोन वेळा महापौर पदी निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रं-१७ हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांचा बालेकिल्ला असून गेल्या निवडणुकीत पक्षाचे चार नगरसेवक याच प्रभागातून निवडून आले होते. गंगोत्री यांच्या सोबत निवडून आलेले अन्य तीन नगरसेवका पैकी एकजण भाजप, दुसरा शिंदेसेना तर ऐक जण अपक्ष म्हणून निवडणूक रींगणात उभे ठाकले. शिंदेसेनेकडून शहरप्रमुख व सतत सात वेळा नगरसेवक पदी निवडून आलेले रमेश चव्हाण यांच्यासह उघोगपती निलू चांडवानी, माजी नगरसेवक सुमन सचदेव असे दिग्गज उभे ठाकले आहे. तसेच भाजपानेही येथे माजी नगरसेवक सतराम दास जेसवानी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे केले आहे. दोन्ही प्रभागातील बिग फाईटकडे लक्ष लागले असून आतापासून कोण जिंकणार याबाबत पैज लागत आहेत.
Web Summary : Ulhasnagar's ward 15 sees Dhananjay Bodare (BJP) versus Arun Ashan (Shinde Sena). Ward 17 features Ramesh Chavan (Shinde Sena), Bharat Gangotri (NCP-Ajit Pawar), and Amar Lunde (BJP) in a high-stakes battle. All eyes are on these crucial municipal corporation elections.
Web Summary : उल्हासनगर के वार्ड 15 में धनंजय बोडारे (भाजपा) बनाम अरुण आशान (शिंदे सेना) हैं। वार्ड 17 में रमेश चव्हाण (शिंदे सेना), भारत गंगोत्री (एनसीपी-अजित पवार), और अमर लुंडे (भाजपा) के बीच मुकाबला है। सबकी निगाहें इन महत्वपूर्ण नगर निगम चुनावों पर हैं।