शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांची उचलबांगडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 00:11 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आयएएस दर्जाचे डॉ. राजा दयानिधी यांची  आयुक्तपदी नियुक्ती केली.

उल्हासनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डॉ. राजा दयानिधी यांना चांगले यश लाभले असले तरी पाणीटंचाई, पाणीचोरी रोखणे, अवैध बांधकामांना प्रभावीपणे आळा घालणे आदी समस्यांच्या हाताळणीत दयानिधी यांना अपयश आल्याने त्यांची बदली केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.देशातील सर्वाधिक घनतेच्या उल्हासनगर शहराला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या बदलीनंतर कोरोना संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आयएएस दर्जाचे डॉ. राजा दयानिधी यांची  आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर कोरोनाची संख्या आटोक्यात आली असली तरी, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. शहरात पाणीटंचाईची समस्या ‘जैसे थे’ असून, पाणी गळती थांबता थांबत नाही. महापालिकेच्या सर्वच विभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची टीका सत्ताधारी शिवसेना व आघाडीतील मित्रपक्षाकडून होत आहे. अवैध बांधकामावर कारवाई होण्याऐवजी प्रभाग अधिकाऱ्यांच्या फक्त बदल्या होत आहेत. मालमत्ता कर व पाणीपुरवठा विभागासाठी अभय योजना लावूनही वसुली नाही. एकूणच महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.

nआयुक्त डॉ. दयानिधी यापूर्वीच्या आयुक्तांप्रमाणे शहराचा पाहणी दौरा का करीत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे, तसेच आयुक्त काही मोजके अपवाद सोडल्यास नगरसेवक, नागरिक व पत्रकारांना भेटत नाहीत. त्यामुळे आयुक्तांसोबत मोठ्या वर्गाचा संवाद नाही. nसत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते ‘आयुक्त बदला, शहर वाचवा’ अशी प्रतिक्रिया खाजगीत देत आहेत. जिल्हास्तरीय नेत्यांकडे आयुक्त बदलाची मागणी केली आहे, अशी चर्चा आहे. nनवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची आयुक्तपदी निवड होणार आहे, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. दयानिधी यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही. 

टॅग्स :thaneठाणे