शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या कारला अपंग उपोषणकर्त्याचा घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 20:14 IST

नाल्यावरील अवैध बांधकामावर कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या विजय सिंग याने गुरवारी दुपारी आयुक्तांच्या गाडी समोर ठाण मांडले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : नाल्यावरील अवैध बांधकामावर कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या विजय सिंग याने गुरवारी दुपारी आयुक्तांच्या गाडी समोर ठाण मांडले. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी गाडी खाली उतरून दोन्ही पायाने अपंग असलेल्या विजय सिंग यांचे म्हणणे एकून घेतले. तसेच चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

उल्हासनगर खेमानी परिसरातील अमरधाम मुकुंदनगर नाल्यावरील अवैध बांधकामामुळे पावसाळ्यात घरात पाणी घुसून वित्तहानी होत आहे. अशी तक्रार दोन्ही पायाने अपंग असलेल्या विजय सिंग हे गेल्या एका वर्षा पासून करीत आहेत. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल प्रभाग समिती क्रं-२ चें सहायक आयुक्त तुषार सोनावानें घेत नसल्याच्या निषेधार्थ विजय सिंग आमरण उपोषणाला महापालिके समोर बसले आहे. तसेच नाल्यातील पाणी बांधलेल्या बांधकामामुळे घरात घुसून कशी परिस्थिती होते. याचें फोटोही तक्रारीत व उपोषण ठिकाणी लावले. मात्र महापालिका प्रशासन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने, त्यांच्या उपोषणाला नागरिकांचा पाठिंबा वाढला. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची गाडी महापालिका प्रवेशद्वार मधून गुरवारी दुपारी बाहेर पडताच अपंग असलेले विजय सिंग यांनी गाडी समोर ठाण मांडले. माझे म्हणणे आपणास एकावेच लागेल. अशी मागणी त्याने केली. यावेळी महापालिका सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. उपोषणाला पाठिंबा देणाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना गाडी खाली उतरावे लागले. तसेच उपोषणकर्ते विजय सिंग यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत माहिती घेऊन अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नाल्यावर अवैध बांधलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी असून घरात घुसत आहे. अश्या नाल्यावरील अवैध बांधकामाला महापालिका अधिकारी पाठीशी का घालत आहेत. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

वालधुनीचे पुराचे पाणी झोपडपट्टीत घुसणार? शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात आरसीसीचे बांधकामे नीलम हॉटेल मागे, उल्हासनगर स्टेशन जवळ, हिराघाट आदी ठिकाणी उभे राहिले. या बांधकामाला राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. मात्र येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणी पुराचे पाणी अडून झोपडपट्टीत घुसण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी अप्रिय घटना घडण्याची चर्चा रंगली आहे. तर महापालिकेने नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतल्याची टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर