शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 17:04 IST

उल्हासनगर ओटी सेक्शन परिसरातून टोनी सिरवानी साई पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर बुधवारी रात्री साडे बारा वाजता व्हीनस चौकात खुनी हल्ला झाला. मारहाणीवेळी बघ्याची गर्दी झाल्याने हल्लेखोरांनी इनोव्हा गाडीतून पळ काढला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर ओटी सेक्शन परिसरातून टोनी सिरवानी साई पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. बुधवारी रात्री 12 वाजता सहकारी नगरसेवक शेरी लुंड यांना बंगले परिसरात घरी सोडून व्हीनस चौकातून घरी परत जातेवेळी, चौकात टोनी यांच्या गाडी समोर इनोव्हा गाडी लावून सात जणांच्या टोळक्याने हल्ला चढविला. मात्र, नेहमी वर्दळीच्या चौकात हाणामारी सुरू झाल्याने बघ्यांनी गर्दी केली. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. टोळी पैकी एकाच्या हातात पिस्तूल तर दुसऱ्याच्या हातात तलवार होती. टोनी यांच्यावरील हल्ल्याचा सर्वच पक्षांनी निषेध व्यक्त केला असून हल्ल्याबाबत तर्क वितर्क काढण्यात येत आहे. टोनी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

खुनी हल्ल्यात जखमी झालेले टोनी सिरवानी हे स्थायी समिती सभापती पदाचे मुख्य दावेदार होते. साई पक्षाकडून त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप एकत्र आल्याने टोनी यांचे नाव मागे पडून ओमी कलानी टीमचे राजेश वधारिया यांचे नाव चर्चेत आले. स्थायी समिती सभापतीं पदाची निवडणूक 21 मे रोजी असून 17 मे रोजी अर्ज भरण्याची तारीख आहे. यातूनच हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात शेरी लुंड यांची महापालिका सभागृह नेते पदी निवड झाली आहे.

शिवसेनेसोबत केलेला घरोबा अंगलटओमी कलानी टीमच्या पंचम कलानी महापौर होऊ नये म्हणून, टोनी सिरवानी यांच्यासह साई पक्षाच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेसोबत घरोबा केला. बंडखोर साई गटाच्या ज्योती भतीजा यांना महापौर करण्याचा डाव टोनी यांचा होता. पण ऐन वेळी 7 नगरसेवकांपैकी शेरी लुंड पुन्हा सत्ताधारी भाजपातील साई पक्षात परत गेल्याने, टोनी यांचा डाव फसून पालघर येथील फार्महाऊस येथे टोनीसह समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्याना शिवसैनिकाकडून शिवीगाळ व मारहाण झाल्याची चर्चा रंगली होती. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर