शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

उल्हासनगर भाजपातील फूट टाळण्याचे प्रयत्न

By admin | Updated: December 28, 2016 04:02 IST

ओमी कलानी टीमला प्रवेश देण्यावरून पक्षात पडणारी फूट टाळण्यासाठी पक्षनेतृत्वाने तातडीने तीन असंतुष्टांचा कोअर कमिटीत समावेश करून पक्षातील वाद शमवण्याचा प्रयत्न

उल्हासनगर : ओमी कलानी टीमला प्रवेश देण्यावरून पक्षात पडणारी फूट टाळण्यासाठी पक्षनेतृत्वाने तातडीने तीन असंतुष्टांचा कोअर कमिटीत समावेश करून पक्षातील वाद शमवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानंतरही पक्षहितासाठी कलानी प्रवेशाचा विषय सोडलेला नाही, असे सांगत या असंतुष्टांचे प्रतिनिधी, पक्षाचे महासचिव प्रदीप रामचंदानी यांनी भूमिका कायम ठेवली आहे. पक्षातील पक्षातील टक्के असंतुष्ट पदाधिकारी व नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, कलानी यांच्या प्रवेशामुळे शिवसेना नाराज होऊ नये म्हणून रिपाइंपाठोपाठ भाजपा नेत्यांनी सेनेशीही प्राथमिक वाटाघाटी केल्या आहेत. युतीत मागील निवडणुकीसारख्या निम्म्या जागांचे वाटप होणार की नवा फॉर्म्युला ठरवला जाणार हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पष्ट होईल.कलानी यांना पक्षप्रवेश न दिल्यास पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या टीममध्ये दाखल होण्याची उघडउघड तयारी केल्याने तातडीने शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी नगरसेवक जमनुदास पुरस्वानी, राजा वानखडे, प्रकाश माखीजा, महेश सुखरामणी यांचा कोअर कमिटीत समावेश केला. भाजपाला उल्हासनगरचे महापौरपद मिळवायचे असल्यास ओमी कलानी टीमला प्रवेश देण्याची मागणी पक्षातील एका गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यानी प्रवेशाला हिरवा कंदील दाखवताच कुमार आयलानी गटाने आपल्या राजकीय अस्तित्वाचा विषय समोर आणत कलानी टीमला विरोध केला. त्यावर कोअर कमिटीमार्फत शिक्कामोर्तब घडवून आणले, तर पक्षाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, माजी शहरजिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, लाल पंजाबी, जमनुदास पुरस्वानी, प्रकाश मखिजा, राम चार्ली या गटाने कलानी टीमला पाठिंबा देत प्रवेशाची मागणी लावून धरली. दरम्यान, कोअर कमिटीत आयलानी यांची पत्नी मीना, त्यांच्या कार्यालयातील मंगला चांडा, राजा गेमनानी, त्यांचे नातेवाईक व त्यांच्या पक्षातील मित्रांचा समावेश असल्याचा आरोप करत विरोधकांनी या कमिटीच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यातून कोअर कमिटीतील आयलानी यांच्या वर्चस्वालाच धक्का देण्याची रणनीती पक्षातील विरोधकांनी आखल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी निवडणुकीच्या तोंडावर कलानींचा भाजपा प्रवेश होईल, असे पक्षातील एका गटाने ठामपणे सांगण्यास सुरूवात केली आहे. (प्रतिनिधी)जानेवारीत जागावाटप पक्षातील फूट टाळण्यासाठी विरोधकांना कोअर कमिटीत स्थान द्यावे लागल्यानंतर भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी लगेचच युतीसंदर्भात शिवसेनेशी वाटाघाटी करून पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी केली.ओमी कलानी यांच्या टीमला प्रवेश देऊन शिवसेनेला बाजुला ठेवण्याची खेळी त्यांच्या विरोधी गटाने चालवली आहे. तिला शह देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, कल्याण लोकसभा जिल्हाउपप्रमुख चंद्रकांत बोडारे, गटनेते सुभाष मनसुलकर, धनंजय बोडारे यांच्यासोबत त्यांनी युतीची प्राथमिक चर्चा केली. रिपाइंसोबत मंगळवारी रात्री चर्चा करणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. जानेवारीच्या पहिल्या आठवडयात जागा वाटपाबाबतची चर्चा होईल, असे ते म्हणाले.