शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये असंतोषाचे वारे, स्थायी समितीतील पराभव जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:06 IST

BJP News : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

उल्हासनगर : महापौर, उपमहापौर यापाठोपाठ स्थायी समिती सभापतीपदी पराभव झाल्याने भाजप कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना विश्वासात घेण्यासाठी शुक्रवारी कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत पक्षविरोधी कारवाई केलेले शहर महासचिव रवी पाटील यांची हकालपट्टी करून ओमप्रकाश वर्मा यांची त्यापदी शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी निवड केली.उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. बैठकीला आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, मनोहर खेमचंदानी, प्रकाश माखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी, लाल पंजाबी, राजू जग्यासी, मंगला चांडा, अर्चना करणकाळे आदी उपस्थित होते. पक्षातील बंडखोर नगरसेवक व पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या पदाधिकारींबाबत चर्चा झाली. शहर महासचिव पाटील यांच्यावर कारवाई केली. तसेच बंडखोर नगरसेवकांबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पुरस्वानी म्हणाले.महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांवर अद्याप कारवाई झाली नसल्यानेच पक्षाला बंडखोरीची लागण लागल्याची प्रतिक्रिया पदाधिकारी, कार्यकर्ते देत आहेत. स्थायी, प्रभाग समिती सभापती निवडणुकीपूर्वी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत ओमी कलानी यांची बैठक झाल्यावर ओमी टीम समर्थक नगरसेवक पुन्हा भाजपकडे आले. मात्र, त्याचा फायदा पक्षाला झाला नाही. उलट महापौर, उपमहापौर यापाठोपाठ स्थायी समिती सभापतीपद बहुमत असताना हातातून गेले. 

पदाधिकारी यांचे राजीनामासत्रभाजपच्या शहराध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यावर पक्ष मजबूत होण्याऐवजी बंडखोरी वाढल्याची टीका युवानेते संजय सिंग यांनी केली. झालेल्या पराभवानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाulhasnagarउल्हासनगरPoliticsराजकारण