शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील कपडा व्यापाऱ्याच्या खुनाचा उलगडा, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 10:59 IST

कपडे धुण्याच्या धोपटण्याने कपडा व्यापाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेचा उलगडा झाला आहे. 

उल्हासनगर : कपडे धुण्याच्या धोपटण्याने कपडा व्यापाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी एका पेंटरला अटक केली असून अवघ्या 9 हजारासाठी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं.3 परिसरातील राहत्या घरी कपडा व्यापारी प्रकाश काच्छानी यांची 9 ऑगस्ट रोजी हत्या झाली होती. कपडे धुण्याच्या धोपटण्याने डोक्यावर प्रहार करून हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी मुंबईच्या खार भागातून संजय शर्मा याला तब्बल 19 दिवसांनी अटक केली. संजय हा पेशाने पेंटर असून तो मूळचा बिहार राज्यातला आहे. त्याची मृत व्यापारी प्रकाश काच्छानी यांच्याशी ओळख होती. तसेच एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. 

9 ऑगस्ट रोजी प्रकाश राहत्या घरी न जाता चोपडा कोर्ट परिसरातील जुन्या घरी जाऊन झोपी गेला. संजय शर्मा नेहमीप्रमाणे जुन्या घरी गेला असता प्रकाश झोपलेल्या अवस्थेत होता. पैशाच्या आमिषाने संजय याने बाथरूममध्ये असलेल्या कपडे धुण्याच्या धोपटण्याने, झोपलेल्या प्रकाशच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून, खिशात असलेले 9 हजार रुपये आणि मोबाईल घेऊन पसार झाला. प्रकाश काच्छनी यांची अवघ्या 9 हजारासाठी  हत्या केल्याची कबूली संजय शर्मा यांनी पोलिसांना दिली. संजय याला बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करीत आहे. 

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक