उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्षात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:55 AM2018-06-20T05:55:44+5:302018-06-20T05:55:44+5:30

मध्यवर्ती पोलिस स्टेशनच्या बॅरेकमधील महिला तक्रार निवारण कक्षात अर्जदार व विरोधी पक्षात तुडुंब हाणामारी झाली.

Ulhaasnagar Women's grievance redressal cell | उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्षात राडा

उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्षात राडा

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलिस स्टेशनच्या बॅरेकमधील महिला तक्रार निवारण कक्षात अर्जदार व विरोधी पक्षात तुडुंब हाणामारी झाली. एकमेकांना चाकू दाखविण्यापर्यंत पोहचलेल्या या हाणामारीत महिला पोलीस व समुपदेशिकाही जखमी झाल्या.
पोलिस नाईक सुलक्षणा चंदनशिवे यांनी अर्जदार व गैरअर्जदार समीर चांगले व सचिन मुर्तुडकर यांना चौकशी व आपापले म्हणणे मांडण्यासाठी बोलाविले होते. दुपारी सव्वाबारा वाजता दोंघाची चौकशी सुरू असताना, त्यावेळी बाहेर बसलेल्या ८-९ जणांनी महिला तक्रार निवारण कं्रेद्रात धाव घेऊन हाणामारी सुरू केली. त्यांनी एकमेकावर चाकू दाखवून कक्षातील सामानाची तोडफोड केली. अर्जदार व गैरअर्जदार यांना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस नाईक सुलक्षणा चंदणशिवे व समुपदेशिका संजीवणी भानुशाली यांच्याही हाताला मार लागला आहे. पोलिस नाईक सुलक्षणा चंदनशिवे यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी अर्जदार व गैरअर्जदार समिर चांगले यांच्यासह सचिन मुर्तूडकर व त्यांच्या ८- ९ सहकाºयांविरोधात गुन्हा दाखल केला. मध्यवर्ती पोलिस अधिक तपास करीत आहेत. मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या बॅरेकमध्ये महिला तक्रार निवारण केंद्र असून कक्षासमोरच पोलिस परिमंडळ-४ चे पोलिस नियंत्रण कक्ष आहे. तसेच शेजारील रूम मध्ये पोलिस उपायुक्त संजीव गोयल यांचे कार्यालय आहे. अशा ठिकाणी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

Web Title: Ulhaasnagar Women's grievance redressal cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.