शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उकडीचा प्रतिनग मोदक @२५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:33 IST

बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईची झळ बसली आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईची झळ बसली आहे. कच्चा माल महागल्यामुळे प्रतिमोदकाचा दर थेट २५ रुपयांवर येऊन पोहोचला आहे. मोदकाच्या वाढलेल्या दरामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. खिशाला परवडेल इतकेच मोदक गणेशभक्तांकडून यावेळेस खरेदी होतील, असे निरीक्षण उपाहारगृहांच्या मालकांनी नोंदवले.गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. सर्वत्र खरेदीचा उत्साह आहे. भक्तांनी आपल्या तयारीचा जोर वाढवला आहे. यात महत्त्वाची तयारी असते, ती बाप्पाच्या नैवेद्याची. उकडीचा मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य असल्याने घरोघरी हा नैवेद्य दाखवला जातो. परंतु, नोकरीमुळे आणि वेळेअभावी महिलावर्गाला घरी ते बनवणे शक्य नसते. तसेच, ते प्रत्येकालाच बनवता येतात असे नाही. यातूनच रेडिमेड उकडीचे मोदक ही संकल्पना अस्तित्वात आली आणि ती काळानुसार चांगलीच रुजली. उपाहारगृहांमध्ये उकडीच्या मोदकांची आवर्जून विक्री केली जाते. काही महिला घरीच आॅर्डर्स घेतात. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गेल्या आठवडाभरापासून उकडीच्या मोदकांचे बुकिंग सुरू झाले आहे. या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपाहारगृहाच्या मालकांनी सांगितले. २२ रुपयांना मिळणारा मोदक यंदा २५ रुपये प्रतिनग मिळणार आहे. मोदकांचा दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. जिथे ११ मोदक खरेदी केले जात होते, तिथे सात किंवा पाच मोदकांची खरेदी होईल. त्यामुळे उकडीच्या मोदकांची खरेदी होईल पण खिसा चाचपूनच, असा सूर बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. उकडीच्या मोदकांना जीएसटीची झळ बसणार नाही, असे उपाहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले.>पहिल्या दिवशीच या मोदकांची खरेदी होणार असल्याने पहाटेपासून मोदक बनवण्यास सुरुवात होईल. आतापर्यंत ३५५५ मोदकांचे बुकिंग झाले असून पाच हजार मोदक बनवले जाणार आहे.- संजय पुराणिक

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव