शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 23:40 IST

राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले.

अजित मांडके

ठाणे -  एकीकडे ठाण्यात शनिवारी रात्री उबाठा सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचा भगवा सप्ताह निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. तर दुसरीकडे त्याच वेळेस ठाण्यातील आनंद आश्रम येथे उबाठा सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अनिता बिर्जे या उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत ठाम होत्या. त्यामुळे त्यांना महिला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीपासून बिर्जे या उबाठा सेनेसोबत फारशा दिसून येत नव्हत्या. अखेर शनिवारी रात्री त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करुन उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीच्या खेटा - एकनाथ शिंदे यांची टीकापूर्वी दिल्लीतले नेते मातोश्रीच्या पटांगणात येत होते. मात्र आता मातोश्रीच दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत, मला मुख्यमंत्री करा म्हणून खेटा घालत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

सरकार स्थापन झाल्यापासून सरकार परिणाम म्हणून पडणार म्हणून अशी ओरड करत आहेत मात्र आता सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाले अद्यापही सरकार टिकून आहे. कारण आम्ही बाळासाहेब आणि दिघे साहेबांची विचार सोडलेले नाहीत म्हणूनच आमचे सरकार टिकून आहे असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला सुपारी फेकली गेली आणि ॲक्शनला रिएक्शन ही असतेच परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत याचे समर्थन होऊ शकणार नसल्याचेही ते म्हणाले. परंतु ज्यांनी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे