शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंविरुद्धच्या लढाईत 'दिघें'ची एन्ट्री झाली, पण 'मातोश्री'ला उशिरा जाग आली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 19:10 IST

उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे.

कुजबुज

१.‘मातोश्री’ला उशिरा जाग आली

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद खिळखिळी झाली आहे. महत्त्वाचे शिलेदार  शिंदेंच्या कळपात गेले आहेत. ज्या आनंद दिघेंनी जिल्ह्यात शिवसेना वाढविली, त्यांच्याच नावाचा आधार घेऊन शिंदे जिल्ह्यात वाटचाल करीत आहे. शिवाय दिघे यांचे कार्यालय असलेल्या ठाणे येथील आनंद मठावर शिंदे समर्थकांनी ताबा सांगितला होता. त्यानंतर मातोश्रीने ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे, याबाबत निर्णय घेतला नव्हता. 

आता उशिरा का होईना रविवारी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविली आहे. ठाणेकर आणि दिघे या आडनावाचे भावनिक नाते आहे. यामुळे ठाकरे यांनी शिंदेच्या बंडानंतर लगेच केदार यांच्याकडे नेतृत्व सोपवून त्यांना आनंद मठाचा ताबा घ्यायला सांगून तेथून जिल्हा शिवसेनेचा कारभार हाताळला असता तर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची पडझड थांबली असती, एवढे नुकसान झाले नसते. 

२. शिवसैनिक असल्याचा टेंभा ! 

कालपर्यंत एका ताटात जेवणारे परस्परांचे अक्षरश: वैरी झाले आहेत. शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर आणि श्याम चौगुले यांच्यावर घेतला गेलेला चोरीचा आळ आणि धमकी दिल्याचा झालेला आरोप पाहता  कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या दोन गटातील वाद आता थेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेला आहे. 

खोट्या तक्रारी दाखल करून घेताना आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. आमच्यावर कितीही दडपण आणा, पण आम्ही गळाला लागणार नाही, अशी भाषा शिवसैनिक करीत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असा नारा शिंदे गटात गेलेले स्थानिक पदाधिकारी देत आहेत, पण ते शिवसैनिक नाहीत. 

राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे असा प्रवास करून पुन्हा शिवसेनेत आलेल्यांनी आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे शिवसैनिक असल्याचे बोलूच नये. शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेत आलेले त्यांच्याबरोबरच पक्षातून बाहेर गेले. त्यामुळे मूळचा शिवसैनिक पक्षात आहे तिथेच आहे. शिंदे गटात येण्यासाठी कितीही खोटेनाटे आरोप करून त्रास दिला तरी शिवसैनिक अधिक जोमाने पेटून उठेल आणि पक्ष संघटना मजबूत करेल, अशी कुजबुज जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाthaneठाणे