- सदानंद नाईकउल्हासनगर - उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह समर्थकाचा भाजपा प्रवेश बुधवारी दुपारी झाल्यानंतर, सायंकाळी उद्धवसेनेचे अंबरनाथ विधानसभा प्रमुख राजेश वानखडे यांच्यासह समर्थकांनी भाजपा प्रवेश झाला. या प्रवेशाने उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
उल्हासनगर उद्धवसेनेला गळती लागली असून एकाच दिवसी मात्र वेगवेगळ्या वेळी मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित प्रवेश प्रक्रिया पार पडली. दुपारी बोडारे समर्थकांचा प्रवेश पार पडल्यानंतर, सायंकाळी अंबरनाथ विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक राजेश वानखडे यांचा प्रवेश पार पडला. वानखडे यांच्यासह अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. वानखडे हे भाजपाच्या तिकिटावर महापालिकेत नगरसेवक पदावर निवडून आले होते. दरम्यान त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केल्यावरही ते जास्त सक्रिय नव्हते.
Web Summary : Following Dhananjay Bodare's entry, Uddhav Sena's Ambernath chief Rajesh Wankhede joined BJP with supporters. This is a setback for Uddhav Sena in Ulhasnagar. The entry took place in Mumbai in the presence of Ravindra Chavan.
Web Summary : धनंजय बोडारे के बाद, उद्धव सेना के अंबरनाथ प्रमुख राजेश वानखेड़े समर्थकों के साथ भाजपा में शामिल हुए। उल्हासनगर में उद्धव सेना को झटका। प्रवेश रविंद्र चव्हाण की उपस्थिति में मुंबई में हुआ।