शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:28 IST

मनसेला २५ जागा हव्यात

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महाविकास आघाडीची पहिली बैठक ठाण्यात शुक्रवारी पार पडली असून, या बैठकीत शरद पवार गटाने कळवा, मुंब्यातील जागांसह ठाण्यातील तब्बल ५० जागांची मागणी शरद पवार गटाने केली. उद्धवसेनेनेदेखील ५० पेक्षा अधिक जागांची अपेक्षा ठेवली, तर मनसेने २५ च्या आसपास जागांची मागणी केल्याची माहिती आहे. काँग्रेसला मुंब्यात सोबत घेण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे. तसेच ठाण्यातील काही जागांचीदेखील मागणी काँग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यात महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान, उद्धवसेनेचे नेते राजन विचारे, मनसेचे ठाण्यातील स्थानिक नेते, काँग्रेसचे पदाधिकारी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विधानसभानिहाय जागांवर चर्चा झाली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेना आणि मनसेला अधिकची मते मिळाली होती. त्यामुळे येथील जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला. तसेच उद्धवसेना आणि मनसे थोड्याफार प्रमाणात कमी अधिक जागा घेतील, अशी चर्चा बैठकीत झाली. 

तसेच मुंब्र्यात  काँग्रेसला मानणारा मतदार असल्याने याठिकाणी जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसने एकूण ३० ते ३५ जागांची मागणी केली. उद्धवसेनेनेची ४५ ते ५० जागांची अपेक्षा आहे. त्या जागा कुठे आणि कोणत्या प्रभागांत असतील, त्याची चर्चा झाली. दरम्यान, जागावाटपाबाबत आणखी दोन बैठका पार पाडणार असून, लवकरच जागावाटपावर एकमत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

"महाविकास आघाडीची पहिलीच बैठक झाली. चांगल्याप्रकारे चर्चा झाली. प्रत्येक पक्षाने जागांचा फॉर्म्युला स्पष्ट केला. आम्ही मुंब्राची मागणी केली." - मनोज प्रधान, शहराध्यक्ष, शरद पवार गट, ठाणे

"पहिल्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या जागावाटपाबाबत सांगोपांग चर्चा झाली. लवकरच जागावाटपाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते जाहीर करतील." - रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे

"दोन बैठका अद्याप बाकी आहेत. मात्र, आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करणार असून, त्यानुसार पुढील बैठकीत जागा वाटपावर एकमत होईल." विक्रांत चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस, ठाणे

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena claims 100 of 131 Thane seats: Pawar faction

Web Summary : Maha Vikas Aghadi's first Thane meeting saw seat-sharing discussions. Shiv Sena (UBT) wants more than 50 seats. Pawar's group claimed 50, including Kalwa and Mumbra. Congress seeks Mumbra seats. More meetings are planned to finalize allocation.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६mumbraमुंब्रा