शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 06:08 IST

'शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही’, असाही झळकला बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागताच ठाण्यात उद्धवसेना व शिंदेसेना यांच्यात बॅनर वॉर भडकले आहे. अगोदर ‘खरी शिवसेना कोणाची?’ असा सवाल करीत ठाणेकरांचा कौल घेण्याचा प्रयत्न उद्धवसेनेचे केदार दिघे यांनी केला. काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीकरिता उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी करताच ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’, अशा घोषवाक्याचे आणि सोबत उद्धव ठाकरे काँग्रेसश्रेष्ठींना लोटांगण घालत असल्याचे व्यंग्यचित्र असलेले बॅनर शिंदेसेनेकडून झळकले. उद्धवसेनेने तीन पेट्रोलपंप येथील हे बॅनर खाली उतरवले. येत्या काही दिवसांत हे बॅनरयुद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दोन दिवसांपूर्वी बॅनर लावत, ‘पक्ष कोणी चोरला? काय आहे हिंदुत्व?’, असा सवाल थेट ठाणेकरांना केला. सोबत व्हॉट्सॲप नंबर देऊन मत नोंदविण्याचे आवाहन केले. दिघे यांनी ठाणेकरांना आवाहन करण्याकरिता लावलेला तो बॅनर ठाण्यात ठिकठिकाणी आजही कायम आहे. उद्धव यांचा दिल्ली दौरा पूर्ण होताच ठाण्यात ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’, अशी टिप्पणी केलेले बॅनर लागले. त्यावर शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी लोटांगण घातले असून, त्यांच्या मागे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ही मंडळी दाखविण्यात आली. बॅनरची माहिती उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरविले. 

शिवसैनिक तुमचा नोकर नाही

ठाण्यात आणखी एक बॅनर लागला असून, त्याच्यावर ‘पक्ष कोणी विकला? खुर्ची, पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्त्वांच्या गोष्टी करू नयेत. शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही’, असे नमूद केले आहे. बॅनरच्या खाली राजेश मोरे यांचे नाव आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. बॅनर लावताना स्वत:चे नाव न देता, फोटो न लावता अशा प्रकारचे फालतू बॅनर लावून चर्चेत यायचे हा प्रकार केविलवाणा आहे. त्यामुळे मला त्यांची कीव येते.- केदार दिघे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे