शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

उद्धवसेना मनसेचा ठाण्यात निघाला पहिला एकत्रित मोर्चा, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटही मोर्चा झाला सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:06 IST

ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारीवर्गाने तिला पोखरून टाकले.

ठाणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेना व मनसे यांनी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात राज्यातील पहिला मोर्चा सोमवारी काढून ठाकरेबंधूंच्या एकजुटीचे दर्शन घडवले. दोन्ही पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला काँग्रेस व शरद पवार गट या महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला. 

ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारीवर्गाने तिला पोखरून टाकले. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि ठाणेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलाे आहोत, असा नारा नेत्यांनी धडक मोर्चाच्या निमित्ताने दिला.  यावेळी महापालिका आयुक्तांची नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

मोर्चानंतर पालिका मुख्यालयाजवळ संयुक्त सभा पार पडली. यावेळी उपस्थित नेत्यांनी भ्रष्टाचारविरोधाचा सूर आळवला. या मोर्चात उद्धवसेनेचे नेते आ. भास्कर जाधव, माजी खा. राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण महिला जिल्हाप्रमुख वैशाली दरेकर, दीपेश म्हात्रे, मनसेचे नेते अभिजित पानसे, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रवक्ते राहुल पिंगळे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नेत्यांनी पालिका आयुक्तांना घेरलेनेत्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पाणीटंचाईची समस्या, अनधिकृत बांधकामे, भ्रष्टाचार आदी मुद्द्यावरून राव यांना धारेवर धरले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. 

तक्रार करून कारवाई होत नाही, अनधिकृत बांधकामप्रकरणी दोषी असलेल्या सहायक आयुक्तांवर काय कारवाई केली, कोणाच्या दबावाखाली काम करत आहात, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. निवडणूक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे यांना हटवा, त्यांची बदली का केली जात नाही, असा सवाल केला असता त्यांची बदली केली जाईल, असे आश्वासन राव यांनी दिले. 

मतदार यादीवर काम सुरू आहे. मात्र, त्यात काही घोळ झाला, बोगस मतदार घुसवले, तर यावेळी त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा राजन विचारे यांनी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena, MNS, Congress, and NCP Unite Against Thane Corruption

Web Summary : Uddhav Sena and MNS held their first joint rally in Thane against municipal corruption, supported by Congress and Sharad Pawar's NCP. Leaders submitted a memorandum to the Municipal Commissioner, raising concerns about traffic, potholes, water scarcity, and unauthorized constructions.
टॅग्स :thaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे