शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आताची शिक्षणपद्धती चरितार्थ चालवू शकत नाही; उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 05:41 IST

‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’ची शिक्षण परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : विद्यार्थ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे ते स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपली शिक्षणपद्धती ही अधिक प्रगल्भ कशी होईल, याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. 

‘आंतर भारती’ आणि ‘ग्राममंगल’च्या वतीने रविवारी गडकरी रंगायतनमध्ये ‘ग्राममंगल’ या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांची वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषद पार पडली. सामंत म्हणाले की, शिक्षण परिषद हा कार्यक्रम शासनाने घेतला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण, त्यांची अंमलबजावणी यातून भावी पिढीला काय द्यायचे, याचा विचार शासनाने करावा. ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस ठरलाे, पण ऑफलाइन परीक्षा जाहीर करताच राक्षस झालो. शिक्षण ऑफलाइन चालेल, पण परीक्षा ऑनलाइन घ्या, असे विद्यार्थी सांगतात तेव्हा चिंता वाटते.  

समुद्र आणि त्यातील जीवसृष्टीचा अभ्यास करणारे विद्यापीठ तयार करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील आपली शिक्षण पद्धत वेगळी आणि सुदृढ ठरावी की, परदेशातून शैक्षणिक संस्थांनी आपल्याकडे येउन तिचा अभ्यास करावा. त्यानुसार देशासाठी आदर्श पॅटर्न ठरेल असे काम शालेय व उच्च शिक्षणात राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. डाॅ. अनिल काकोडकर आणि इतर ज्येष्ठ शिक्षण मंडळी नवीन शिक्षण धोरणाचा अहवाल मांडत असतील तर तो स्वीकारलाच पाहिजे. यापुढे होणाऱ्या शिक्षण परिषदेला मी श्रोता म्हणून बसेन. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा कोकणपट्ट्यात बालशिक्षणाची गरज आहे. याची सुरुवात माझ्या क्षेत्रात, विभागात करता येते का, याचा प्रथम विचार करेन, असेही ते म्हणाले.

पानसे यांच्यासोबतच्या भेटीची चर्चा

- मनसेचे नेते अभिजित पानसे हे सामंतांना नुकतेच भेटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. - त्यावर सामंत म्हणाले, पानसे सामंत यांच्याकडे आले काय आणि सामंत पानसे यांच्याकडे आले काय, याने काय फरक पडताे. दाेघे भेटले तर चांगलेच आहे ना, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली.

आपले मत काय आहे? 

शिक्षणमंत्र्यांच्या या विधानाविषयी आपल्याला काय वाटते? आपण आपले मत आम्हाला ९५९४०५७४५५ या क्रमांकावर कळवावे. यानिमित्ताने या विषयावर समूळ चर्चा व्हावी अशी ‘लाेकमत’ची भूमिका आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंत