शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरूणींनी ओढणीने गळा दाबून केली महिलेची हत्या; पोलीस तपासात झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 08:06 IST

मिळालेल्या माहितीनुसार रायता गाव येथे दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसन मुक्ती केंद्र आहे

उमेश जाधव

टिटवाळा-: व्यसन मुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत अससणा-या दोन तरूणींनी एका महिलेची ओढणीने गळा आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यास टिटवाळा पोलिसांना यश आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रायता गाव येथे दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसन मुक्ती केंद्र आहे. या केंद्रात किशोरी सावंत (३४)या महिलेसह  ईशा पांडे (१९), विशाखा कोटावे (१९) या दोन तरूणी उपचारासाठी अ‍ॅडमिट होत्या. किशोरीमुळे आपल्याला या केंद्रातून डीचार्ज मिळत नाही असा भ्रम ईशा व विशाखा या दोघींना झाला होता. त्यामुळे त्या कारणावरून त्या दोघी किशोरीकडे रागाने बघायच्या. त्या केंद्रातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्या दोघींनी  किशोरी हिचा कायमचाच काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी किशोरी हिच्या जेवणात उवा मारण्याचे औषध मिसळवले. ते औषध तिने खाल्ल्यावर त्या दोघींनी ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून व तोंडावर उशी दाबून तिला ठार मारले होते. आपले कृत्य उघडकीस येवू नये या करीता त्या दोघींनी किशोरी हिने आत्महत्या केली असल्याची बोंंब ठोकली होती. किशोरी हिचा मृतदेह वैद्यकिय तपासणी व पोस्ट मार्टमसाठी कल्याण येथील राणी रुक्मिणीबाई रुग्णालय येथे नेण्यात आले होते. सर्व प्रथम महात्मा फुले पोलिस ठाण्यात या घाटनेप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. तो एडीआर टिटवाळा पोलिस ठाण्याात वर्ग करण्यात आल्यावर व.पो.नि.पांढरे व पो.उप.नि.प्रदीप आरोटे यांनी त्याचा तपास सुरू केला. या शिवाय वैद्यकिय तपासणी अहवालात किशोरी हिचा मृत्यू गळा आवळून झाला असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनी या गुन्हयाचा सखोल तपास करीत किशोरी हिच्यासोबत राहणा-या व तिच्या ओळखीच्या ईशा व विशाखा या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या चौकशीत त्या दोघींनीही किशोरी सावंत या महिलेची हत्या केली असल्याचे तपासात उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी ईशा व विशाखा या दोन तरूणीं विरूध्द टिटवाळा पोलिस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पो.उप.नि.प्रदीप आरोटे करीत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस