शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्वाईन फ्लुने दोन दिवसात दोन महिलांचा मृत्यू; २० जणांना लागण

By अजित मांडके | Updated: July 25, 2022 15:41 IST

मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही स्वाईन फ्लूने दस्तक दिल्याचे दिसून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही स्वाईन फ्लूने दस्तक दिल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसात ठाणे शहरात या आजाराचे २० रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यु या आजाराने झाला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या दोनही महिला कोपरी भागातील असल्याचे सांगण्यात आले असून त्यानुसार आता या भागाचा सव्र्हे करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे. त्यानुसार ६०० घरांचे सव्र्हेक्षण करण्यात आले असून त्यात अद्याप कोणाला लक्षणो आढळलेली नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाची साथ काही प्रमाणात आटोक्यात येत असतांना आता ठाण्यात स्वाईन फ्लुने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. त्यात स्वाईन फ्लूने दोघांचा बळी घेतला आहे. मृत झालेल्यांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश असून एकीचे वय ७१ दुसऱ्या महिलेचे वय ५१ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहेर्. आहे. यातील पहिली महिला रुग्ण ही १४ जुलै रोजी उपचारांसाठी दाखल झाली. त्यानंतर १९ जुलैला तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर दुसरी महिला ही १४ जुलैलाच खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा मृत्यु १८ जुलै रोजी झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तर जुलै महिन्यात २० स्वाईन फ्लूचे रु ग्ण आढळून आले असून यातील १५ जणांवर यशस्वी उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

याशिवाय डेंग्यु आणि मलेरियाचे रु ग्ण देखील वाढले असून ठाण्यात सध्या डेंग्यूचे ८ तर मलेरियाचे १४ रु ग्ण अढळले आहेत. मात्न या आजाराने एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत ६०० लोकांच्या घरात जाऊन तापाचे आणि स्वाईन फ्लू ची लक्षणे  आहेत की नाही याची तपासणी केली आहे. यामध्ये अजूनही कोणाला लक्षणो अढळली नसली तरी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका