शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरुन कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यु: एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 22:32 IST

नाशिक मुंबई मार्गावरील ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरुन सुमारे २५ फूट खाली रस्त्यावर कोसळून दुचाकीवर मागे बसलेल्या अबुझर शेख (२८) याचा जागीच मृत्यु झाला. तर फहाद रहेमतुल्ला शेख (३०, रा. मुंब्रा, ठाणे) हा दुचाकी चालक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा उड्डाणपूलाच्या कठडयाला दुचाकीची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येथील माजीवडा नाशिक मुंबई मार्गावरील उड्डाणपूलावरुन २५ ते ३० फूट खाली रस्त्यावर कोसळून दुचाकीवर मागे बसलेल्या अबुझर शफीक शेख (२८, रा. मुंब्रा, ठाणे) याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. तर फहाद रहेमतुल्ला शेख (३०, रा. मुंब्रा, ठाणे) हा दुचाकी चालक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.मुंब्रा येथील अमृतनगर भागातील रहिवाशी असलेले फहाद आणि अबुझर हे दोघेही मुंब्रा येथे मोबाइल दुरुस्तीचे काम करतात. ते काही कामानिमित्त मोटारसायकलीवरुन ठाण्यातील कासारवडवली भागात आले होते. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडने मुंब्य्राकडे जात होते. तेंव्हा फहाद मोटारसायकल चालवित होता. तर त्याचा मित्र अबुझर हा मोटारसायकलवर त्याच्या मागे बसलेला होता. ते माजीवडा उड्डाणपूलावर भरघाव वेगात डावीकडे वळण घेतांना दुभाजकाला त्यांची मोटारसायकल जोरदार धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात दोघांचेही मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चालक फहाद आणि मागे बसलेला अबुझर हे दोघेही थेट उड्डाणपूलाखाली असलेल्या गोल्डन डाईज नाका येथील माजीवडा चौकात खाली कोसळले. या घटनेत अबुझरच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर फहाद हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याही डोक्याला तसेच चेहऱ्यावर, हाताला आणि पायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. या अपघातास कारणीभूत असलेल्या फहाद याच्याविरुद्ध हयगयीने मोटारसायकल चालवून अबुझर शेख याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणीकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.* यापूर्वीही असाच प्रकारचा अपघातदोन महिन्यांपूर्वीही याच मार्गावर एक कंटेनर खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मार्गावर होणाºया अशा अपघातांना एमएसआरडीसी, ठाणे महापालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात