शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील १३ कामगारांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाण्याच्या वाहतूक शाखेने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 21:17 IST

एकीकडे परराज्यातील मजूरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे तिथेच रहावे. त्यांची सर्व जबाबदारी राज्य सरकारकडून घेतली जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे मुंबईतून मालवाहू वाहनांमधून आपआपल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी मजूरांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशाच १३ मजूरांना दोन वाहनांमधून पळ काढतांना ठाण्याच्या वाहतूक शाखेने मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची आता निवारा केंद्रात रवानगी झाली आहे.

ठळक मुद्देदोन चालकांना अटक१३ कामगारांची निवारा केंद्रात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबईतून कल्याणकडे जाणाऱ्या कंटेनरसह दोन वेगवेगळया वाहनांना ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले. यातील आठ कामागारांची नौपाडा येथील निवारा केंद्रात रवानगी केली असून दोन्ही वाहनांच्या चालकांना अटक केली आहे.मुंबईतील गोरेगाव भागातून कल्याणकडे जाणा-या एका कंटेनरमधून आठ कामगारांना नेण्यात येत होते. तर गोवंडीतून कल्याणकडे जाणाºया लहान टेम्पोमधून पाच कामगारांना नेले जात होते. या दोन्ही वाहनांना ठाण्यातील नितीन कंपनीजवळ ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या गस्तीवरील पथकाने २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पकडले. पहिल्या कंटेनरमधून आठ कामगार हे मध्यप्रदेशात जाणार होते. ते या कंटेनरमधून कल्याणपर्यंत गेल्यानंतर तिथून अन्य वाहनाने ते जाणार होते. तर दुस-या फळे आणि भाजी घेऊन जाणाºया अत्यावश्यक सेवेतील टेम्पातून पाच कामगारही कल्याणला जाण्यासाठी टेम्पोमध्ये गोवंडीतून बसले होते. कोरोनामुळे केलेल्या संचारबंदीमध्ये रोजच्या जेवणाचे प्रचंड हाल होत असल्यामुळे आपण मुळगावी जात असल्याचे या कामगारांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा १८८ तसेच रोगराई पसरविण्यास मदत करण्याच्या कलम २६९ नुसार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून या सर्व कामगारांची नौपाडयातील निवारा केंद्रात तात्पूरती सोय केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस