शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल; नारायण पवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 23:49 IST

सिद्धेश्वर तलाव परिसराचा क्लस्टर आराखड्यात समावेश 

ठाणे : महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे दोन हजार कुटुंबांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर आराखड्यात या परिसराचाही समावेश झाल्याबद्दल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ठाणे शहरात सिद्धेश्वर या तलावाभोवती झोपडपट्टीमध्ये दोन हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. अनेक वर्षांपासून या भागात ६० ते ७० जुन्या इमारती असून अनेक वर्षांपासून शेकडो कुटुंबे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत होता. 

मात्र, परिसराच्या झोपडपट्टीतील रहिवाशांना जुन्या घरातच राहावे लागत होते. या भागाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातूनही विकास करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर ठाण्यात क्लस्टर योजनेची चाचपणी सुरू झाल्यावर या परिसराचा तीत समावेशासाठी पवार यांनी प्रयत्न केले. अखेर, तीत सिद्धेश्वर तलाव परिसराचाही समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सिद्धेश्वर परिसर यूआरपी क्र. ९ अनुसार, २१.५६ हेक्टर क्षेत्रावर क्लस्टर उभारले जाईल. सुधारित प्रारूपमधील एकूण आरक्षित व रस्ता क्षेत्रासाठी ७.७८ हेक्टर जागा निश्चित केली आहे. 

काही वर्षांपासून सिद्धेश्वर तलाव परिसरातील रहिवासी नव्या घरकुलांच्या प्रतीक्षेत होते. क्लस्टर योजनेत समावेश झाल्यामुळे त्यांना हक्काचे घर उपलब्ध होऊन अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल. - नारायण पवार,  नगरसेवक, भाजप

पाचपाखाडी परिसराचा विकास होत असतानाच आम्ही जुन्या घरांमध्येच वास्तव्य करीत होतो. अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे आम्ही पक्क्या घरांपासून वंचित होतो. मात्र, पवार यांच्या प्रयत्नांमुळे आता आम्हाला घर मिळू शकेल. - प्रकाश काळभोर, रहिवासी, सिद्धेश्वर तलाव परिसर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपा